उद्योजक अश्नीर ग्रोव्हर Bigg Boss 18 मध्ये नुकताच सहभागी झालेला. अश्नीरच्या Bigg Boss 18 मधील एन्ट्रीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अश्नीरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री होताच सलमानने त्याची चांगलीच फिरकी घेतली. याशिवाय अश्नीरच्या एका जुन्या मुलाखतीमधील संदर्भ घेत त्याच्या वागण्यावर ताशेरे ओढले. आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीरने सलमान खान आणि Bigg Boss 18 विषयी मोठा खुलासा केला.
Bigg Boss 18 बद्दल अश्नीर काय म्हणाला?
x हँडलवर अश्नीरने सलमान खानसोबतचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "मला आशा आहे की तुम्ही बिग बॉसमधील वीकेंड का वारचा आनंद घेतला असेल. मलाही खूप मजा आली. आणि मला खात्री आहे की या एपिसोडला चांगला TRP आणि Views मिळाले असतील." हे लिहून अश्नीरने पुढे मुद्देसूद त्याची बाजू सर्वांना सांगितली. अश्नीर पुढे लिहितो की,
- सलमान एक शानदार होस्ट आणि अभिनेता आहे. बिग बॉसमध्ये काय चालणार हे त्यांना माहितीय
- मी सलमानचं कायम त्याच्या बिझनेस सेंसमुळे कौतुक केलंय. मी त्यांच्याविषयी आजवर कधीच वाईट बोललो नाहीय
- माझ्या डीलचे नंबर कायम बरोबर असतात. मे २०१९ मध्ये एका हॉटेलमध्ये मी सलमानला ३ तासांसाठी भेटलो होतो. त्यावेळी director of ad सोबत होते. जर सलमान आता मला ओळखत नसेल तर ठीकेय. तो त्यावेळी असंख्य लोकांना भेटला असेल. मी तेव्हा कोणीही पब्लिक फिगर नव्हतो.
- बिग बॉसमधील पाहुण्यांचे निमंत्रण 'निनावी' नव्हते - अगदी त्या चेकप्रमाणे.
- आणि फायनली मला त्याच्यासोबत फोटो काढता आला. जो मी आधी काढला नव्हता
सलमान अश्नीरला बिग बॉसच्या मंचावर काय म्हणाला?
Bigg Boss 18 मध्ये वीकेंड का वारमध्ये अश्नीर ग्रोव्हरची एन्ट्री होती. पुढे सलमानने अश्नीरला विचारलेलं की, "तुम्ही माझ्याबद्दल जे बोललात की मला इतक्या पैशांमध्ये साइन केलं. ते सर्व आकडे तुम्ही चुकीचे सांगितले. हा कोणता दोगलापन आहे?" यावर उत्तर देताना अश्नीर म्हणालेला की, "तुम्हाला जेव्हा आम्ही ब्रँड अँबेसेडर बनवलं तो आमचा सगळ्यात स्मार्ट निर्णय होता." पुढे सलमान म्हणतो की, "आता जो तुमचा बोलण्याचा टोन आहे तो तेव्हा नव्हता. त्यावेळी तुमचा अॅटिट्यूड काहीतरी वेगळाच होता." हे ऐकताच अश्नीरची बोलती बंद होते.