Join us

​शांवरनं आपल्या लूकसाठी या बड्या स्टार्सनं केलं कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 16:54 IST

‘एक माँ जो लाखों के लिए बनी अम्मा’ या मालिकेतून अभिनेता शाँवर अली छोट्या पडद्यावर पदार्पण करतोय.. या मालिकेत शावर ...

‘एक माँ जो लाखों के लिए बनी अम्मा’ या मालिकेतून अभिनेता शाँवर अली छोट्या पडद्यावर पदार्पण करतोय.. या मालिकेत शावर परवेज नावाच्या वकीलाची भूमिका साकारतोय.1960च्या दशकातील या वकीलाची भूमिका साकारण्यासाठी शावरनं किशोर कुमार आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून प्रेरणा घेतलीय.किशोरदा चौकोनी कडा असलेला चष्मा लावायचे.. त्यांच्याप्रमाणेच शावरनंही असाच काहीसा चष्मा या भूमिकेसाठी वापरलाय.. चष्म्यासोबतच किशोरदांची हेअरस्टाईलही त्यानं कॉपी करण्याचा प्रयत्न केलाय. साईड हेअरस्टाईलसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांना फॉलो केल्याचं शांवरनं सांगितलंय.