Join us

‘शनाया’चे हे आहे पहिले प्रेम, ड्रीम रोलबाबतही काय आहे तिचं मत जाणून घ्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 10:16 IST

छोट्या पडद्यावर 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजते आहे.या मालिकेला रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. गेले वर्षभर रसिकांची आवडती ...

छोट्या पडद्यावर 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजते आहे.या मालिकेला रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. गेले वर्षभर रसिकांची आवडती मालिका म्हणून माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला पसंती मिळाली आहे. या मालिकेतील राधिका, गुरुनाथ आणि शनाया यांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. विशेषतःराधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावत आहे. राधिकाची भूमिका अनिता दाते आणि शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत आहे.शनाया या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिकाने शनाया साकारली आहे.तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना भावतो आहे.त्यामुळे प्रत्येक वयोगटातील रसिकांना शनाया भावते आहे. त्यामुळे आपली लाडकी अभिनेत्री शनाया या मालिकेसह आणखी कोणत्या मालिका किंवा सिनेमा करणार हे जाणून घेण्याचीही रसिकांना उत्सुकता असते.मात्र सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचे शेड्युल टाईट असून शनाया या भूमिकेवरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे रसिकाने स्पष्ट केले आहे. मालिका, रंगभूमी आणि सिनेमा ही तिन्ही माध्यमं वेगळी असून तिन्ही माध्यमांची वेगळी आव्हाने असल्याचे तिला वाटतं. मात्र नाटक हे आपलं प्रेम असून आगामी काळात संधी मिळाल्यास नाटकात काम करायला आवडेल असं तिनं आवर्जून सांगितलं आहे. नाटकातून थेट रसिकांसमोर भूमिका साकारायची असते. त्यात रिटेक नसतात त्यामुळे ते आव्हानात्मक असल्याचे रसिकाला वाटतं. याशिवाय रसिकाला  आता संधी मिळाल्यास पोलीस, गुप्तहेर किंवा टॉम बॉय अंदाज असलेली भूमिका साकारण्याची इच्छा आहे. मात्र सध्या तरी तिचे सारे लक्ष शनाया भूमिकेवर आहे.मालिकेत झळकण्यापूर्वी रसिकांने पोस्टर गर्ल या मराठी सिनेमात झळकली होती.कशाला लावतो नाट या गाण्यावर तिने अस्सल मराठमोळ्या अंदाजात लावणी करताना ती थिरकली होती. पोस्टर गर्ल सिनेमातले हे गाणे हे खूप लोकप्रिय ठरले.आणि याच गाण्यामुळे तिच्या करिअरला नवीन वळण मिळाले.पोस्टर गर्ल गाण्यात लावणीवर थिरकलेली रसिकाला पाहताच सारेच आश्चर्यचकीत होतात.मालिकेत धड  मराठीही न  बोलणारी शनाया सिनेमात मात्र लावणी करताना दिसते तेव्हा सा-यांनाच एक सुखद धक्का बसतो.लावणी करतानाचा तिचा हा लूकचीही चांगलीच भुरळ पडल्याचे पाहायला मिळते.रूपेरी पडद्यावर झळकलेल्या रसिका सुनील त्यावेळी लोकप्रिय नव्हती.मात्र हे गाणेच तिच्यासाठी टर्निंग पाईंट ठरला आणि शनाया बनत तिने छोट्या पडद्या माझ्या नव-याची बायको मालिकेत एंट्री घतेली.