Join us
Daily Top 2Weekly Top 5

शमिता शेट्टीने खतरों के खिलाडीच्या चित्रीकरणाला केली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 14:59 IST

अभिनेत्री शमिता शेट्टीची तब्येत ठीक नव्हती. मात्र आता तिला बरे वाटले असून तिने 'खतरों के खिलाडी'च्या शूटिंगला सुरूवात केली आहे

ठळक मुद्देशमिताला झाला होता डेंग्यूशमिताने केली चित्रीकरणाला सुरूवात

अभिनेत्री शमिता शेट्टी लवकरच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो 'खतरों के खिलाडी'मध्ये स्टंट करताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिची तब्येत ठीक नसल्यामुळे ती शो सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र नुकतेच तिने अर्जेंटिनाला जाऊन शूटिंगला सुरूवात केली आहे.

अभिनेत्री शमिता शेट्टीची तब्येत ठीक नव्हती. मात्र आता तिला बरे वाटले असून तिने 'खतरों के खिलाडी'च्या शूटिंगला सुरूवात केली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार शमिता अर्जेंटिनाला गेली त्यावेळी तिला बरे वाटत नव्हते. तिथे काही टेस्ट केल्यानंतर तिला डेंग्यु झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. काही दिवस आराम केल्यानंतर तिने चित्रीकरणाला सुरूवात केली आहे.शमिता शो सोडून भारतात परतणार असे वृत्त येत होते. मात्र तिला शो सोडायचा नव्हता. त्यामुळे तिने तिथे राहून आराम केला. पूर्ण बरे नाही वाटले तरीदेखील तिने चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. तिने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, मी हळू हळू बरी होते आहे. चित्रीकरणाला मी सुरूवात केली आहे. मी स्टंटदेखील केले. या शोमध्ये बेस्ट देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 'खतरों के खिलाडी'चा हा नववा सीझन असून यात विकास गुप्ता, अविका गौर, हर्ष, भारती, पुनीत, स्मिता शेट्टी, अविका गौर या कलाकारांचा समावेश आहे. या शोव्यतिरिक्त शमिता आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करणार आहे. यात ती मीराच्या भूमिकेत दिसणार आहे. शमिता 'खतरों के खिलाडी'मध्ये काय कमाल दाखवते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.