Join us
Daily Top 2Weekly Top 5

या मालिकेसाठी पार्श्वगायन करणार शाल्मली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 16:42 IST

शाल्मली खोलगडे ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी आहे. आता पर्यंत तिने गायलेली गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. हिंदीव्यतिरिक्त, तिने मराठी, बंगाली, तेलुगू आणि तामिळ अशा अन्य भारतीय भाषांमधूनही गाणी गायली आहेत

शाल्मली खोलगडे ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी आहे. आता पर्यंत तिने गायलेली गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. हिंदीव्यतिरिक्त, तिने मराठी, बंगाली, तेलुगू आणि तामिळ अशा अन्य भारतीय भाषांमधूनही गाणी गायली आहेत. प्रेक्षकांसाठी काहीतरी खास करण्याच्या उद्देश्याने शाल्मलीने स्टार भारतवरील राधाकृष्णच्या शीर्षकगीताची मराठी आवृत्ती गाण्याचे ठरवले. राधाकृष्ण यांच्यामधील सुंदर नाते दर्शवणारे सुरेख गीत शाल्मली लवकरच प्रस्तुत करेल. हम्प्टी शर्मा की दुल्हनियां, एक व्हिलन आणि नावाजलेला मराठी चित्रपट टाईमपाससारख्या चित्रपटांमध्ये ती गाणी गायली आहेत. 

तरूण आणि हुशार अशी ही पार्श्वगायिका शाल्मली खोलगडे म्हणाली, “राधाकृष्णच्या ह्या अप्रतिम गाण्याच्या मी प्रेमातच पाडले आणि मला अगदी तत्क्षणी ठाऊक होतं की याची मराठी आवृत्ती मीच गाणार। मला आशा आहे की प्रेक्षकांनाही ते तेवढेच आवडेल.”

निखळ, विशुध्द आणि दैवी प्रेमाचे अजरामर प्रतीक असलेली राधा-कृष्णाची प्रेमकथा तिच्या भव्य आणि सुंदर आविष्करामुळे प्रेक्षकांचे लक्ष निश्चितच वेधून घेईल. नेहमीच पौराणिक मालिकेला रसिकांचे प्रचंड प्रेम मिळत आले आहे. पौराणिक मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा रसिकांना प्रचंड आवडत असतात. राधा कृष्ण ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला देखील प्रेक्षकांचा प्रेम सुरुवातीपासूनच मिळते आहे. सुमेध मुदगलकर या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारायला मिळाल्यामुळे सुमेध सध्या खूपच खूश आहे. या मालिकेतील कृष्णाची भूमिका महत्त्वाची असल्याने या भूमिकेसाठी अनेक कलाकारांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. ही एक संगीत मालिका असून त्यात रासलीलेच्या विविध भावना व्यक्त करताना नृत्य आणि संगीताचा वापर केला जाणार आहे.

टॅग्स :राधा कृष्णशाल्मली खोलगडे