Television Actress : अभिनेत्री वैष्णवी मॅक्डॉनल्ड हे हिंदी मालिकाविश्वातील नावाजलेलं नाव आहे. चित्रपट ते मालिका असा यशस्वी प्रवास करणाऱ्या वैष्णवी यांची कारकीर्द खूप मोठी आहे. लोकप्रिय शक्तिमान मालिकेत त्यांनी साकारलेलं गीता विश्वास हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र, अभिनय क्षेत्रात त्यांना काही चांगल्या-वाईट अनुभवांना समोरं जावं लागलं. करिअरच्या सुरुवातीला वैष्णवी मॅक्डॉनल्ड यांना कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. ज्यामुळे त्यांनी चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या चित्रपटसृष्टीत काम करताना आलेले अनुभव कथन केले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत वैष्णवी मॅक्डोनल्ड यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.एका सिनेमाचे पोस्टर आणि बॅनर छापले गेले असतानाही तडजोड न केल्याबद्दल तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. त्या कटू आठवणी शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, "एकदा मला आणि माझ्या आईला ऑफिसमध्ये बसवण्यात आले आणि सांगण्यात आलं, 'हे बघा, चित्रपटाचे पोस्टर्स आणि बॅनर छापले गेले आहेत.पण, वैष्णवी आता या चित्रपटात काम करू शकत नाही." वैष्णवी यांना चित्रपटात मुख्य नायिका म्हणून कास्ट करण्यात आलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी त्यांना प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आलं. "
रात्रीच्या वेळेस मला एकटीला भेटायला बोलावलं अन्...
वैष्णवी पुढे म्हणाल्या,"त्याने मला संध्याकाळी एकटी भेटायला ये असं येण्यास सांगितलं. तो म्हणाला, 'ही फक्त पुरुषांची पार्टी आहे, एकटीच ये.आपण सगळे एकत्र ड्रिंक करू. पण मी जिथे जिथे जायचे तिथे माझी आई नेहमीच माझ्यासोबत असायची. यामुळे बऱ्याच जणांना ही गोष्ट खटकायची. ती मला कधीही एकटी सोडत नव्हती. माझी आई मला कामाच्या ठिकाणी सोडायला यायची आणि घरी जाताना देखील ती न्यायला यायची. प्रॉडक्शन हाऊसने माझा पासपोर्टही बनवून घेतला पण आईसाठी ते शक्य नाही, असं सांगितले कारण मला शूटिंगसाठी स्वित्झर्लंडला जायचं होतं."
"चित्रपटाचे दिग्दर्शक चांगलेच होते.पण, त्यात जो मुख्य अभिनेता होता त्याला माझ्यात इंट्रेस्ट होता. जेव्हा मी नकार दिला तेव्हा त्याला राग आला. त्यावेळी एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचा तो एक मोठा चित्रपट होता आणि मला शेवटच्या क्षणी काढून टाकण्यात आलं. चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि मुख्य कलाकार यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला.मी लोकांमध्ये जास्त मिसळायची नाही, त्यामुळे चित्रपटसृष्टीतील माझं करिअर जास्त काळ टिकलं नाही.मी तोकडे कपडे कधीच घातले नाहीत, मी कोणासोबतही एकटी कुठेही जात नसे.सुरुवातीला मला खूप ऑफर्स आल्या, पण नंतर हळूहळू ऑफर्स बंद झाल्या.मग मी मालिकांमध्ये काम करायचं ठरवलं."
Web Summary : Vaishnavi Macdonald faced casting couch early in her career. A co-star asked her to meet alone for drinks. She was removed from a film for refusing his advances and not socializing enough, leading her to television.
Web Summary : वैष्णवी मैकडोनाल्ड को करियर की शुरुआत में कास्टिंग काउच का सामना करना पड़ा। एक सह-कलाकार ने उसे अकेले मिलने और ड्रिंक करने के लिए कहा। इनकार करने और पर्याप्त मेलजोल न रखने पर उन्हें एक फिल्म से हटा दिया गया, जिसके कारण उन्होंने टेलीविजन का रुख किया।