Join us

प्रीतीने केली शाहरुखची नक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 11:12 IST

प्रीती झिंटा आणि शाहरुख खानने कल हो ना हो या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील प्रीती आणि शाहरुखची केमिस्ट्री ...

प्रीती झिंटा आणि शाहरुख खानने कल हो ना हो या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील प्रीती आणि शाहरुखची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. खऱ्या आयुष्यातही प्रीती आणि शाहरुख हे एकमेकांचे खूपच चांगले फ्रेंड्स आहेत. प्रीतीने आपल्या या लाडक्या मित्राची नक्कल नुकतीच कॉमेडी नाईटस लाईव्ह या कार्यक्रमात केली. शाहरुखची सिगनिचर स्टेप सगळ्यांनाच खूप आवडते. प्रीतीने या कार्यक्रमात हीच स्टेप करून दाखवली. यावेळी कॉमेडीयन कृष्णा अभिषेकनेही तिला साथ दिली. या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमसोबत प्रीतीने खूप धमालमस्ती केली.