Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा अभिनेता स्वत:ला समजतो शाहरूख खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 15:48 IST

'मे आय कम इन मॅडम' मध्ये साजनच्या भूमिकेत दिसणारा संदिप आनंदची व्यक्तिरेखा संजना (मॅडमच्या भूमिकेतील नेहा पेंडसे) हिच्या प्रेमात ...

'मे आय कम इन मॅडम' मध्ये साजनच्या भूमिकेत दिसणारा संदिप आनंदची व्यक्तिरेखा संजना (मॅडमच्या भूमिकेतील नेहा पेंडसे) हिच्या प्रेमात पार बुडाला आहे.तिला मागणी घालण्यासाठी किंग ऑफ रोमान्स शाहरूख कडून प्रेरणा घेतली असल्याचे संदिप आनंदने सांगितले. या सीन मध्ये तो आपले प्रेम संजनाकडे व्यक्त करेल. ते नीट जमण्यासाठी त्याने शाहरूखची सुपरहिट पोज  हात पसरून भावना व्यक्त करण्याची सिग्नेचर स्टेप केली. सूत्रांकडून समजते की संदिप शाहरूखचा जबरदस्त चाहता आहे व त्याला कधीतरी ही स्टेप करायचीच होती. आता या सीनमुळे ते शक्य झाले.याबद्दल बोलताना संदिप आनंद म्हणतो, “शाहरूखसारखे पडद्यावर प्रेम कुणालाही व्यक्त करता येत नाही.त्याच्या अभिनयाचा चाहता असल्याने मी या सीनसाठी त्याची स्टाइल केली. मला कुणालातरी प्रपोझ करण्यासाठी ही स्टाइल वापरायचीच होती व जेव्हा या सीनबद्दल मला दिग्दर्शकाकडून समजले तेव्हा मी लगेचच तो सीन असा करण्याबाबत बोललो व त्यास त्यांनी होकारही दिला. मी अगदीच त्याची नक्कल केलेली नसू स्वत:च्या कौशल्यानुसार ही स्टेप करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्याने सांगितले.”मध्यंतरी त्याने संदिपने बावर्चीची भूमिका केली होती त्यावेळी अभिनेता गोविंदाचा ‘हीरो नं. 1’ या सिनेमात साकारलेल्या आचारीच्या भूमिकेपासून  प्रेरणा घेतल्याचे त्याने म्हटले होते. या भागात आचारीची भूमिका अचूक साकारण्यासाठी संदीपने हा सिनेमा 2 ते 3 वेळा पाहिला होता. ‘हीरो नं. 1’सिनेमात नायिका करिष्मा कपूरच्या कुटुंबियांची मने जिंकून घेण्यासाठी गोविंदा त्या घरात आचारी म्हणून काम करतो.त्याचप्रमाणे ‘मे आय कम इन, मॅडम? मालिकेत संदीप आनंद आपल्या बॉसला खुश  करण्यासाठी आचारी बनला  होता. या भागातील भूमिकेवेळेही संदिपने गोविंदाचा मी मोठा फॅन असल्याचे म्हटले होते.