Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानने सांगितला आलिया भटचा हा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 19:27 IST

अभिनेत्री आलिया भट हिला ‘लक्स गोल्डन रोझ अनस्टॉपेबल ब्युटी ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देशाहरूख खानने केले आलियाचे कौतूक

लक्स गोल्डन रोझ पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. बॉलिवूडमधील सर्व कलाकार मंडळी या सोहळ्याला उपस्थित होती. या सोहळ्याचे सूत्रसंचालन किंग खानने केले अर्थात शाहरुख खानने केले. या सोहळ्यात आघाडीची अभिनेत्री आलिया भट हिला ‘लक्स गोल्डन रोझ अनस्टॉपेबल ब्युटी ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आलियाला तिचे काका मुकेश भट आणि ‘राझी’ चित्रपटातील तिचा सहकलाकार विकी कौशल याच्या हस्ते देण्यात आला. आलियाने अल्पावधीत आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आलियाच्या अभिनय कौशल्यावर फिदा असलेल्या शाहरूख खानने तिचे कौतुक केले. यावेळी शाहरुख खानने आलिया सोबतचा 'डिअर जिंदगी'' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी किस्सा सांगितला. तो म्हणाला की, मला कधी कधी संवाद नीट आठवत नसत; पण आलियाला तिचे संवाद नीट लक्षात असायचे. आलिया ही उत्तम अभिनेत्री आहे. तिच्यातील अभिनय गुण हे फारच उत्कृष्ठ असून ती तिच्या करिअरमध्ये नक्कीच यशस्वी होईल.  यावेळी शाहरुख खान आणि आलिया भटबरोबर एक मजेदार खेळ खेळला. त्याने आलियाला अमिताभ बच्चन यांचे काही प्रसिद्ध संवाद म्हणायला सांगितले. जेव्हा ती ते बोलू लागली, तेव्हा त्याने तिचे लक्ष अन्यत्र वळवून ती चुकावी म्हणून शाहरूख तिच्या खोड्या काढीत होता. या कार्यक्रमातील असे अनेक मजेदार प्रसंग, विनोद आणि करमणुकीच्या कार्यक्रमांमुळे हा सोहळा प्रेक्षकांसाठी एक आनंददायक कार्यक्रम ठरेल. हा पुरस्कार सोहळा लवकरच स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानआलिया भट