शाहिद कपूर आणि कंगणा राणौतने केले रंगूनचे प्रमोशन द कपिल शर्मा शोच्या सेटवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 15:14 IST
शाहिद कपूर आणि कंगणा राणौत रंगून या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या चित्रकरणादरम्यान शाहिद आणि कंगनामध्ये काही ...
शाहिद कपूर आणि कंगणा राणौतने केले रंगूनचे प्रमोशन द कपिल शर्मा शोच्या सेटवर
शाहिद कपूर आणि कंगणा राणौत रंगून या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या चित्रकरणादरम्यान शाहिद आणि कंगनामध्ये काही वाद झाले असल्याचे गेल्या कित्येक दिवसांपासून म्हटले जात होते. पण आमच्यात काहीही वाद नसल्याचे स्पष्टीकरण काही दिवसांपूर्वी शाहिदने दिले होते. तसेच वादांमुळे शाहिद आणि कंगणा चित्रपटाचे प्रमोशन एकत्र करणार नसल्याचीदेखील चर्चा होती. त्यावेळीदेखील शाहिदने मला कंगना, सैफ या दोघांसोबतही चित्रपटाचे प्रमोशन करायला आवडेल असे म्हटले होते. आता हा चित्रपट प्रदर्शित व्हायला काहीच दिवस शिल्लक असल्याचे चित्रपटाची टीम या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. लवकरच शाहिद, कंगणा आणि सैफ अली खान कॉफी विथ करणमध्ये उपस्थिती लावून रंगूनचे प्रमोशन करणार असल्याचे नुकतेच शाहिदने म्हटले आहे आणि आता शाहिद आणि कंगनाने प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोच्या सेटला भेट दिली आहे. पण या कार्यक्रमात सैफ कुठेच दिसला नाही. शाहिद आणि कंगनाने द कपिल शर्मा शोमध्ये येऊन कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत खूप मजा मस्ती केली असे त्यांच्या फोटोतून पाहायला मिळत आहे. या दोघांनी सुनील ग्रोव्हर यांच्यासोबत करोडपती हा कार्यक्रमदेखील खेळले. तसेच टिकू शारदा याच्यासोबत शाहिदने अनेक गाण्यांवर ताल धरला. तन्नू वेड्स मन्नू या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये कंगनाने डबल रोल साकारला होता. या चित्रपटात तिने साकारलेली हरियाणी मुलीची भूमिका तर खूप गाजली होती. या कार्यक्रमात सुगंधा मिश्रा कंगणाच्या रूपात अवतरली होती. तसेच नवज्योत सिंग सिद्धू आणि शाहिद कपूर पंजा लढवताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.