Join us

शाहीर शेखला चाहत्यांनी दिले त्याच्या वाढदिवसाला हटके सरप्राईज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 07:15 IST

आपल्या दर्जेदार अभिनयाने अभिनेता शाहीर शेखने आपल्या चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सेटवर शाहिरचा वाढदिवस साजरा करण्यात आला

आपल्या दर्जेदार अभिनयाने अभिनेता शाहीर शेखने आपल्या चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. ‘ये रिश्ते है प्यार के’ या नव्या मालिकेत मानवी नातेसंबंध, विवाह आणि कौटुंबिक संबंध या विषयांवरील एक नवा आणि पुरोगामी दृष्टिकोन सादर करण्यात आला आहे. मालिकेचा नायक शाहीर शेखने आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने तर जिंकली आहेतच, शिवाय सेटवरही तो सर्वांचा लाडका कलाकार बनला आहे. काही दिवसांपूर्वी सेटवर शाहिरचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्याच्या काही फिमेल फॅन्सनी त्याला अनपेक्षित भेट देत सरप्राईज दिले.

शाहीरला पर्यावरणाबद्दल विशेष प्रेम हिच गोष्ट लक्षात घेऊन त्याच्या चाहत्यांनी त्याला पश्चिम बंगालमधील सुंदरबन राष्ट्रीय उद्यानालगतचा भूखंड गिफ्ट म्हणून दिला. चाहत्यांनी या भूखंडावर ‘ट्रीज फॉर टायगर’ या मोहिमेअंतर्गत 50 रोपे लावली.  

शाहीर ही गोष्ट ऐकून भारावून गेला आणि त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली, “माझ्याजीवनात तुमच्यासारखे मित्र आणि शुभचिंतक असल्यामुळे मी स्वत:ला किती सुदैवी आणि आनंदी मानतो.माझ्या पाठीशी कायम उभे राहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.”

शाहीर शेख सेटवरही कलाकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह कायम टिकविण्यासाठी अधूनमधून थट्टा-मस्करी करीत असतो. बरेचदा त्याच्या थट्टेची बळी ही मालिकेत मिष्टीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिया शर्माच ठरते, पण तिला त्याचा हा स्वभाव आवडतो.  

टॅग्स :स्टार प्लस