Join us
Daily Top 2Weekly Top 5

चक्क शाहरुखची हेअर स्टाइल कॉपी केली आयुष्यमान खुराणाच्या पत्नीने, फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 06:30 IST

आयुषमान खंबीरपणे पत्नीच्या पाठी उभा राहिला. त्याच्या सपोर्टमुळेही ताहिराला या आजाराचा सामना करता आला.

शाहरुख खानला आपल्या हेअर स्टाइलसाठी ओळखले जाते. पण आता त्याला आयुष्मान खुराणाची पत्नी ताहिराचे टफ कॉम्पीटिशन मिळत आहे. आपली ही इनसिक्योरिटी शाहरुखने एका ट्वीटद्वारे शेअर केली. यामध्ये त्याच्यासोबत ताहिरादेखील दिसत आहे, जी त्याचा शो टेड टॉक्स इंडियाच्या सेटवर आलेली होती. त्यावेळी ताहिराने हुबेहुब शाहरूख सारखीच हेअर स्टाइल केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी निळ्या रंगाचा सुट तिने परिधान केला होता. काही महिन्यांपूर्वीच ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले होते. या आजाराने तिने धैर्याने सामना केला आणि ती ही लढाई जिंकलीही. ताहिरा विविध कार्यक्रमात तिच्या आजारणाबाबत मोकळेपणाने बोलते. इतकेच नाही तर कमोथेरपीमुळे तिचे डोक्यावरचे केस गेळाले होते.

 मात्र ते लपवण्यासाठी तिने कोणत्याही प्रकारचे खोटे केस लावले नाहीत.अगदी मुंडण केलेल्या आवतारात ती लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवॉकवर अवतरली होती. यावेळी ताहिराचे वेगवेगळ्या स्थरावरून कौतुक झाले होते. आता ताहिरा बॉयकट हेअर स्टाइलमध्ये दिसू लागली आहे. आयुषमान खंबीरपणे पत्नीच्या पाठी उभा राहिला. त्याच्या सपोर्टमुळेही ताहिराला या आजाराचा सामना करता आला. 

आयुष्मान खुराना, यामी गौतम आणि भूमी पेडणेकर स्टारर 'बाला' ला दुसऱ्या दिवशी जबरदस्त ग्रोथ मिळाली. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी सुमारे 15.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले, जे शुक्रवारच्या तुलनेत जवळपास 60 टक्के जास्त आहे. घरगुती बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांचे एकूण कलेक्शन सुमारे 25 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 

टॅग्स :आयुषमान खुराणाताहिरा कश्यप