शाहरूख खानला हवी क्रिकेटर्ससाठी महिला प्रशिक्षक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 09:53 IST
शाहरूख खानने सुरू केलेल्या टेड टॉक्स इंडिया या नव्या कार्यक्रमामुळे लोकांचा नव्या संकल्पनांकडे- मग ती छोटी असो की मोठी- पाहण्याचा ...
शाहरूख खानला हवी क्रिकेटर्ससाठी महिला प्रशिक्षक!
शाहरूख खानने सुरू केलेल्या टेड टॉक्स इंडिया या नव्या कार्यक्रमामुळे लोकांचा नव्या संकल्पनांकडे- मग ती छोटी असो की मोठी- पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. त्याच्या या कार्यक्रमातील वक्ते त्याच्याशी आणि प्रेक्षकांशीही आपुलकीने बोलतात. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची ओळख करून देताना शाहरूखने तिने विश्वचषक स्पर्धेत केलेल्या अपूर्व कामगिरीबद्दल तिचे मन:पूर्वक अभिनंदनही केले. महिला क्रिकेटपटूंच्या सामन्यांबद्दल शाहरूखने विशेष स्वारस्य दाखविले. त्याने सांगितले की महिलांनीच आपल्याला आजवर बळ दिले असून त्यामुळे जेव्हा केव्हा महिला साचेबध्दता तोडून अभूतपूर्व कामगिरी करतात, तेव्हा त्यांच्या बाजूने उभे असणे गरजेचे असते. त्याने सांगितले, “महिला क्रिकेटचा सामना असला की मी पूर्ण रात्र जागून तो बघतोच बघतो.”यंदा महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम फेरीपर्यंत नेण्याची कामगिरी केल्यामुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या मितालीवर खुश झालेला शाहरूख म्हणाला, “तुला आपल्या पुरुष क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देताना मला पाहायचं आहे.” त्यावर मिताली हसून म्हणाली, “मला जे देणं शक्य आहे, ते देण्यास मी नेहमीच तयार असते.”भारताची महिला क्रिकेटपटू आणि महिला संघाची कर्णधार या नात्याने तिने आपले अनुभव सांगत असताना महिला क्रिकेटपटूंसाठी असलेल्या अपुऱ्या सोयी-सुविधांकडेही लक्ष वेधले. ती म्हणाली, “महिला क्रिकेटपटू तयार करण्यास अधिक सोयी-सवलती दिल्यास त्यांचे क्षितीज कितीतरी पटीने विस्तारेल.” तिच्या या सूचनेला दुजोरा देताना शाहरूख म्हणला, “तणावाखालच्या परिस्थितीला एक सच्चा खेळाडूच यशस्वीपणे तोंड देऊ शकतो.”ALSO READ : शाहरूख खानच्या ‘झिरो’ लूकची नेटक-यांनी घेतली मजा!!आपल्या नेहमीच्या मिश्कील स्वभावानुसार यावेळी शाहरूखने व्यासपिठावर मितालीच्या दिशेने गोलंदाजी केली आणि आपण योग्य प्रकारे चेंडू फेकला का, अशी विचारणाही केली.नुकतेच शाहरूख खानने आपल्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा करताना सोबत टीजर ही लाँच केला आहे. आनंद एल राय यांच्या चित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. यंदा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित होणार आहे. आनंद एल राय यांच्या या चित्रपटात शाहरूख खानसोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या दोघी मुख्य भूमिकेत आहेत.