Join us

'विकता का उत्तर'चा सेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 12:49 IST

बॅालिवूड अभिनेता आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा रितेश देशमुख लवकरच 'विकता का उत्तर' या शोच्या माध्यमातून छोट्या ...

बॅालिवूड अभिनेता आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा रितेश देशमुख लवकरच 'विकता का उत्तर' या शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर एंट्री करतोय. या शोमध्ये जिंकण्यासाठी भाव करावा लागणा-या अनोख्या संकल्पनेवर हा गेम शो बेतला आहे.

बुद्धिमत्ताआणि भाव करण्याचं कौशल्य या गेम शो मध्ये पणाला लावावं लागणार आहे. त्यासाठी स्पर्धकाला  ६० भाव करणाऱ्या कलाकारांशी चुरसकरावी लागेल. या गेम शोचं वेगळेपण म्हणजे, यातील स्पर्धकाबरोबरच त्याच्याबरोबर उत्तरासाठी भाव करणारी व्यक्ती ही जिंकू शकणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस स्पर्धकापेक्षा भाव करणारी व्यक्ती जास्त रक्कम जिंकू शकते. 

अभिनेता,लेखक दिग्दर्शक असलेला ह्रषिकेश जोशी, कवी-गीतकार वैभव जोशी,अभिनेत्री लेखिका मुग्धा गोडबोले-रानडे आणि लेखिका पल्लवी करकेरा हे कार्यक्रमाचं लेखनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.