Join us

​गुलाम मालिकेच्या सेटवर निती टेलरने वाजवली परम सिंहच्या कानाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 14:30 IST

गुलाम या मालिकेत परम सिंह आणि निती टेलर प्रमुख भूमिका साकारत आहे. गुलाम ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस ...

गुलाम या मालिकेत परम सिंह आणि निती टेलर प्रमुख भूमिका साकारत आहे. गुलाम ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेबद्दल चांगलीच चर्चा होत आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. या मालिकेतील एका दृश्याचे चित्रीकरण करण्यास परम सिंहने नुकताच नकार दिला होता. गुलाम या मालिकेच्या एका दृश्यामध्ये रंगीला म्हणजेत परम सिंहने नीतीच्या कानाखाली मारणे आवश्यक होते. पण परम सिंह काही केल्या हे दृश्य देण्यास तयार नव्हता. परम सिंहने त्याच्या आयुष्यात आजवर कोणावर हात उगारला नसल्याने नीतीला मारणे त्याला कठीण जात होते आणि महिलेवर हात उगारणे हे माझ्या तत्त्वात बसत नाही असे परम सिंहचे म्हणणे होते.  मालिकेच्या कथानकानुसार रंगलीला म्हणजेच परम सिंहला देण्यात आलेले एक काम त्याने केलेले नसल्याने त्याचा मालक वीर म्हणजेच विकास मानकताला त्याला शिक्षा म्हणून शिवानीच्या म्हणजेच नीती टेलवरच्या कानाखाली वाजवायला सांगतो. या दृश्याबद्दल परमसिंहला दिग्दर्शकाने सांगितल्यानंतर हे दृश्य मी करूच शकत नाही असे स्पष्ट परम सिंहने त्यांना सांगितले. पण केवळ तुला अभिनय करायचा आहे, कोणालाही खरे मारायचे नाही अशी परम सिंहची समजूत मालिकेच्या दिग्दर्शकांनी काढल्यानंतर त्याने या दृश्याचे चित्रीकरण केले. याविषयी परम सिंह सांगतो, "महिलांचा आदर केला पाहिजे, त्यांना मानसन्मान दिला पाहिजे असे मी मानतो. त्यामुळे महिलेच्या श्रीमुखात मारण्याचे दृश्य देण्याचा मी विचारदेखील करू शकत नाही. पण दिग्दर्शकाने मला समजवल्यावर मी या दृश्याचे चित्रीकरण करण्यासाठी होकार दिला."