नागिन परतणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 10:50 IST
नागिन या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये नेहमीच अव्वल ठरली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता ...
नागिन परतणार
नागिन या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये नेहमीच अव्वल ठरली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेचा दुसरा सिझन आणण्याचे निर्मात्यांनी ठरवले आहे. हा सिझन ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असल्याचे म्हटले जात होते. पण नागिन या मालिकेच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. ही मालिका ऑक्टोबर नव्हे तर सप्टेंबरलाच सुरू करण्याचा सध्या निर्मात्यांचा विचार आहे. नागिनमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या मॉनी रॉयनेच ही बातमी मीडियाला दिलेली आहे.