अंगदमुळे मालिकेला मिळणार वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 16:14 IST
24 या मालिकेला सुरू होऊन काही आठवडे झाले आहेत. यंदाच्याही 24च्या सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत ...
अंगदमुळे मालिकेला मिळणार वळण
24 या मालिकेला सुरू होऊन काही आठवडे झाले आहेत. यंदाच्याही 24च्या सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अंगद नकारात्मक भूमिका साकारणार आहे. अंगद ध्रुव ही व्यक्तिरेखा साकारणार असून पैशांच्या जोरावर सगळ्या गोष्टी मिळवता येतात असा समजणारा हा ध्रुव आहे. पैसे कमवण्यासाठी तो काहीही करू शकतो. अनधिकृत खाणकाम करणाऱ्या या ध्रुवमुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे.