Join us

“बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेत बाळूचे सीम्मोउलंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 21:00 IST

कलर्स मराठीवरील “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेमध्ये एक रंजक वळण येणार आहे, कारण बाळूचे सीम्मोउलंघन होणार आहे.

कलर्स मराठीवरील “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेमध्ये एक रंजक वळण येणार आहे, कारण बाळूचे सीम्मोउलंघन होणार आहे.

पंच आणि देवप्पा बऱ्याच दिवसांपासून बाळूला गावाबाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे. पंच आणि देवप्पाने मिळून बऱ्याच खेळी आणि डावपेच केले पण ते सगळे बाळूने उधळून लावले. पंच आणि देवप्पाच्या प्रत्येक कारस्थानाला बाळूने उत्तर दिले. त्यामुळे देवप्पा बाळूला गावाबाहेर कसे काढता येईल याच प्रयत्नामध्ये बरेच दिवस आहे. हेच घडत असताना गोदा आणि तिचा नवरा बाळूची अजून एक तक्रार घेऊन येतात की बाळूने त्यांच्या घरातील सगळी मडकी फोडली. त्यामुळे मयप्पा बाळूवर खूप चिडतो आणि त्याला गावाबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतो. गावाबाहेर चंदुलाल शहा याला सालगडी हवा आहे त्यामुळे तो बाळूला तिकडे पाठवायचे असे निश्चित करतो. बाळू जर गावामध्ये राहिला नाही तर त्यावर कुठला आळ येणार नाही आणि देवप्पा – पंच त्याला काही बोलणार देखील नाही असे मयप्पाला वाटते.दसऱ्याच्या दिवशी गावामध्ये असलेल्या प्रथेप्रमाणे गावकरी गावाच्या वेशीवर पूजा करणार आहेत आणि एकमेकांना सोने देखील देणार आहेत. त्याचवेळी देवप्पा बाळूच्या समोर येणार व देवप्पा बाळूला आव्हान देणार की मी तुला गावाबाहेर काढणार आणि बाळू देवप्पाचे हे आव्हान स्वीकारणार. इतकेच नसून बाळू देखील देवप्पाला आव्हान देणार की तुला बाहेर गावाबाहेर काढण्यासाठी मी गावाची सीमा ओलांडायला देखील तयार आहे. बाळू गावाबाहेर राहून काय करणार ? देवप्पाला कसे उत्तर देणार ? हे सगळे “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :बाळूमामाच्या नावानं चांगभलं