नवाबने सोडली मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 18:35 IST
नागार्जुन -एक योद्धा या मालिकेत नवाब शाह पोलिसांची भूमिका साकारत आहेत. नवाब गेली कित्येक दिवस मालिका सोडणार असल्याची चर्चा ...
नवाबने सोडली मालिका
नागार्जुन -एक योद्धा या मालिकेत नवाब शाह पोलिसांची भूमिका साकारत आहेत. नवाब गेली कित्येक दिवस मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. नवाबची व्यक्तिरेखा मालिकेत ज्याप्रकारे दाखवली जात आहे, ते त्याला पटत नाहीये. यावरून क्रिएटिव्ह टिमसोबत त्याचे सतत खटके उडत आहेत. तसेच तो सेटवर सगळ्यांसोबत सतत वाद करत असल्याचीही चर्चा आहे. या सगळ्यामुळे नवाबची भूमिका संपवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर नवाबचे म्हणणे आहे की, सेटवर चांगले जेवण न मिळाल्यास अथवा चांगले कॉस्च्युम न मिळाल्यास त्याबाबत विचारणे हे त्रास देणे नसते. मी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण माझ्यावर कधीही कोणीही असे आरोप केलेले नाहीत. चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर छोट्या पडद्यावर काम करावे असा विचार करतो होतो. त्याचवेळी मला या मालिकेची ऑफर आली आणि मी ती स्वीकारलीदेखील. पण चित्रीकरण करायला सुरुवात केल्यानंतर रिहर्सल करायला वेळच मिळत नाही. काही वेळा शेवटच्या क्षणी दृश्य काय आहे ते कळते असे मला जाणवले. या गोष्टी मला पटत नाहीयेत. तरीही क्रिएटिव्ह टिम आणि माझ्यात असलेले वाद आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण व्यक्तिरेखा माझ्यामनासारखी दाखवली जात नाहीये असे मला वाटल्यास मी ही मालिका सोडेन असे नवाब सांगतो