Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मृणालनंतर अर्जितने सोडली मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 11:44 IST

कुमकुम भाग्य या मालिकेला काही दिवसांपूर्वी मृणाल ठाकूरने रामराम ठोकला होता. तिच्यानंतर आता या मालिकेत पूरबची भूमिका साकारणाऱ्या अर्जित ...

कुमकुम भाग्य या मालिकेला काही दिवसांपूर्वी मृणाल ठाकूरने रामराम ठोकला होता. तिच्यानंतर आता या मालिकेत पूरबची भूमिका साकारणाऱ्या अर्जित तनेजाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेच्या कथेनुसार आपल्या भूमिकेला वाव नसल्याने मृणालने मालिका सोडली होती आणि आता याच कारणावरून अर्जितने प्रेक्षकांचा निरोप घेण्याचे ठरवले आहे. अर्जितने प्रोडक्शन हाऊसला याबाबत कळवले असून अर्जितची जागा आता कोण घेणार याचा शोध सुरू आहे. मधुबाला एक इश्क एक जुनून या मालिकेत झळकलेल्या गुंजन उतरेजाचा विचार पूरबची भूमिका साकारण्यासाठी केला जात असल्याचे म्हटले जात आहे. गुंजन अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यात व्यग्र असल्याने तो गेल्या कित्येक महिन्यात मालिकांमध्ये काम करू शकला नव्हता. पण कुमकुम भाग्य या मालिकेद्वारे तो पुन्हा अभिनयाकडे वळणार आहे.