Join us
Daily Top 2Weekly Top 5

​खिचडी या मालिकेत चक्की आणि जॅकीच्या भूमिकेत बालकलाकारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 16:38 IST

खिचडी या मालिकेचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना खिचडी या मालिकेतील त्यांचे काही ...

खिचडी या मालिकेचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना खिचडी या मालिकेतील त्यांचे काही लाडके कलाकार पाहायला मिळणार आहेत. त्याचसोबत या मालिकेत आणखी काही नवी कलाकारांची भर पडणार आहे. ही मालिका अनेक वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेची लोकप्रियता आजही थोडीदेखील कमी झालेली नाही. या मालिकेत प्रेक्षकांना बाबुजी, हंसा, प्रफुल्ल, जयश्री, हिमांशू यांसारख्या व्यक्तिरेखा पाहायला मिळाल्या होत्या. या नव्या सिझनमध्ये देखील या व्यक्तिरेखा कायम ठेवण्यात आल्या असून या मालिकेत अनंग देसाई, राजीव मेहता, सुप्रिया पाठक, वंदना पाठक, जे. डी. मजेठिया हे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.खिचडी या मालिकेत हंसा आणि प्रफुल्ल यांची मुलगी चक्की असल्याचे आणि जयश्रीचा मुलगा जॅकी असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. पारेख कुटुंबातील सगळ्यांचेच हे दोघेही लाडके असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले होते. जॅकी आणि चक्की दोघेही शाळेत जात असल्याचे आपल्याला मालिकेत पाहायला मिळाले होते. खिचडी या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला असल्याने या मालिकेत काही वर्षांचा लीप दाखवला जाणार असून या मालिकेत चक्की आणि जॅकी मोठे झालेले दाखवणार असल्याचे म्हटले जात होते. पण जॅकी आणि चक्की यांच्या भूमिकेत प्रेक्षकांना बालकलाकाराच पाहायला मिळणार असल्याचे या मालिकेचे निर्माते जे. डी. मजेठिया यांनीच सांगितले आहे. जे. डी. मजेठिया यांनी नुकतेच सीएनएक्स मस्तीशी बोलताना सांगितले, खिचडी या मालिकेतील दोन्ही कलाकार आपल्याला बालकलाकाराच्या भूमिकेतच पाहायला मिळणार आहे. जॅकी आणि चक्की या दोघांना मालिकेत मोठे दाखवले असता मला काळ काही वर्षांनी पुढे गेला असल्याचे दाखवायला लागले असते. त्यामुळे मालिकेतील अनेक संदर्भ देखील बदलायला लागले असते. पण प्रेक्षकांच्या मनात मालिका जशी आहे, तशीच ती त्यांना दाखवावी असे मला वाटत असल्याने आम्ही मालिकेत बदल करण्याचे टाळले आहे. त्यामुळे या मालिकेत जॅकी आणि चक्की आजही शाळेतच जात असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जॅकी आणि चक्कीच्या भूमिकेत कोणते बालकलाकार असणार हे काहीच दिवसांत प्रेक्षकांना कळेल. Also Read : ​रत्ना पाठक शाह खिचडीमध्ये साकारणार ही भूमिका