सेल्फी तो बनता है
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 14:30 IST
झलक दिखला जा या कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतात. या आठवड्यात पिंक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमिताभ ...
सेल्फी तो बनता है
झलक दिखला जा या कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतात. या आठवड्यात पिंक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमिताभ बच्चन तापसी पन्नूसोबत हजेरी लावणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी करण जोहर आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघांसोबतही काम केले आहे. करणच्या कभी खुशी कभी गम या चित्रपटात तर शावा शावा या गाण्यात ते नाचलेदेखील होते. झलक दिखला जा या कार्यक्रमातही ते या गाण्यावर थिरकले. एवढेच नव्हे तर आजच्या पिढीला पाऊट करून सेल्फी काढण्याचे फॅड आले आहे. अमिताभ यांनीदेखील पाऊट करून करण आणि मनिष पॉलसोबत एक मस्त सेल्फी काढला.