Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PHOTO: 'अंगूरी भाभी'चा HOT फोटो व्हायरल,सोशलमीडियावर उमटल्या संमिश्र प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 16:09 IST

सोशल मीडियावर सगळेच कलाकार खूप अॅक्टीव्ह असतात.यांत आता आपली अंगुरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रेचीही भर पडली आहे.शुभांगी सोशल ...

सोशल मीडियावर सगळेच कलाकार खूप अॅक्टीव्ह असतात.यांत आता आपली अंगुरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रेचीही भर पडली आहे.शुभांगी सोशल मीडियावर खूप  अॅक्टीव्ह असून तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.आता पुन्हा एक फोटो शुभांगीने शेअर केला आहे. या फोटोत तिच्या ग्लॅमरस तितकाच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी रसिकांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे. 'अंगूरी भाभी' नावाने टीव्ही जगतात प्रसिध्द असलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे आपल्या देसी लुकसाठी प्रसिध्द आहे. सध्या शुभांगी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून थायलँडमध्ये हॉलिडे एन्जॉय करते आहे. व्हॅकेशनचे धम्माल मस्तीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोत तिचा हॉट तितकाच ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे. त्यामुळे अंगुरीच्या या किलर अदांनी कुणीही घायाळ झाला नाही तरच नवल.भाभीजी घर पर है या मालिकेत विभूतीची भूमिका साकारणाऱ्या आसिफ शेखला या मालिकेतील इतर कलाकारांपेक्षा जास्त मानधन मिळते. केवळ एका दिवसाचे ७० हजार रुपये मिळतात तर सौम्या टंडनला एका दिवसांचे ५५ हजार ते ६० हजार रुपये मिळतात तर शुभांगी अत्रेला एका दिवसासाठी ४० हजार रुपये मिळतात. शुभांगी पेक्षा अधिक मानधन या मालिकेत मनमोहन तिवारीची भूमिका साकारणाऱ्या रोहिताश गौडला मिळते. रोहिताशला दिवसाचे ५० ते ६० हजार रुपये मिळतात. यासोबतच दरोगा हप्पू सिंग म्हणजेच योगेश त्रिपाठीला ३५ हजार, अनोखेलाल सक्सेना म्हणजेच सानंद वर्माला १५ हजार टिका राम म्हणजेच वैभव माथुरला २५ हजार भुरे लालची भूमिका साकारणाऱ्या राकेश बेदीला २५ हजार इतके मानधन मिळते. ‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रीय शोमधून शिल्पा शिंदे अर्थात ‘अंगूरी भाभी’ने एक्झिट घेतली. त्यामुळेच मालिकेच्या निर्मात्यांनी नव्या ‘अंगूरी भाभी’चा शोध सुरु केला होता.शुभांगी ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत झळकल्यानंतर अल्पावधीतच ती रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शुभांगीने 'कस्तूरी', 'चिड़िया घर', दो हंसों का जोड़ा, हवन, अधूरी कहानी हमारी सारख्या मालिकांमधून काम केले आहे.