Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पाहा डिम्पी गांगुलीच्या मुलीची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 16:49 IST

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या तैमुरची पहिली झलक कधी पाहायला मिळेल याची वाट त्यांचे फॅन्स आतुरतेने पाहात होते. ...

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या तैमुरची पहिली झलक कधी पाहायला मिळेल याची वाट त्यांचे फॅन्स आतुरतेने पाहात होते. तैमुरच्या जन्मानंतर लगेचच तिसऱ्या दिवशी सैफ आणि करिना आपल्या मुलासोबत मीडियासमोर आले आणि तैमुरची झलक सगळ्यांना दाखवली. सैफ आणि करिना आई-वडील बनण्याआधी बिग बॉस फेम डिम्पी गांगुलीनेदेखील मुलीला जन्म दिला होता. पण अद्याप तिच्या मुलीचा फोटा तिने कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केलेला नव्हता.डिम्पीच्या मुलीला पाहाण्याची तिच्या फॅन्सची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. डिम्पीने नुकताच तिच्या मुलीचा एक फोटा इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.पण या फोटोत तिच्या मुलीचा चेहराच दिसत नसल्याने तिच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. तसेच तिने तिच्यासोबत तिच्या मुलीचा आणखी एक फोटा अपलोड केला आहे.पण या फोटातही ती व्यवस्थित दिसत नाहीये.डिम्पीची मुलगी आता सहा महिन्याची झाली असून थोडीशी बोलायलादेखील लागली आहे. या ख्रिस्मसला तिने मम्मा अशी तिला पहिल्यांदाच हाक मारल्यामुळे सध्या ती खूपच खूश आहे.डिम्पीने 2015मध्ये रोहित रॉय या व्यवसायिकासोबत लग्न केले. लग्नानंतर ती दुबईत स्थायिक झाली आहे. रोहितसोबत लग्न करण्याआधी डिम्पीचे लग्न राहुल महाजनसोबत झाले होते. राहुल का स्वयंवर या रिअॅलिटी शोमध्ये राहुलने डिम्पीची त्याची पत्नी म्हणून निवड केली होती. पण लग्नानंतर राहुल तिला प्रचंड मारतो असा आरोप तिने त्याच्यावर वारंवार केला. त्यानंतर काहीच महिन्यात त्या दोघांनी घटस्फोट घेतला.