गुपितं उलगडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 16:11 IST
तेरे बिन या मालिकेत अक्षय अनेक वर्षांपासून गायब होता. तो कुठे आहे, काय करत आहे याची काहीच कल्पना नंदिनीला ...
गुपितं उलगडणार
तेरे बिन या मालिकेत अक्षय अनेक वर्षांपासून गायब होता. तो कुठे आहे, काय करत आहे याची काहीच कल्पना नंदिनीला नव्हती. पण अचानक अनेक वर्षांनी तो तिच्या पुन्हा समोर आला. त्याला पाहिल्यावर नंदिनीला आश्चर्याचा धक्का तर बसला. पण त्याचसोबत ती खूपच खूश झाली. पण आता नंदिनीला आणखी एक धक्का बसणार आहे. अक्षयने लग्न केले असून त्याची पत्नी ही हॉस्पिटलमध्येच एचआर डिपार्टमेंटची प्रमुख आहे हे तिला आता कळणार आहे. त्यानंतर हॉस्पिटलमधील एका बडबड्या मुलीशी तिची मैत्री होणार आहे. ही मुलगी अक्षयची मुलगी असल्याचेही तिला कळणार आहे. नंदिनीच्या समोर एक-एक करून अनेक गुपिते उलगडत जाणार आहेत.