उलगडणार रहस्य?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 12:18 IST
सोनल वेंगुर्लेकर आणि अंकुश अरोरा या प्रमुख कलाकारांमध्ये झालेल्या वादामुळे ये वादा रहा ही मालिका खूपच चर्चेत आली होती. ...
उलगडणार रहस्य?
सोनल वेंगुर्लेकर आणि अंकुश अरोरा या प्रमुख कलाकारांमध्ये झालेल्या वादामुळे ये वादा रहा ही मालिका खूपच चर्चेत आली होती. पण आता त्या दोघांमधील वाद पूर्णपणे मिटला असून त्यांनी चित्रीकरणाला सुरुवातदेखील केलीय. या मालिकेत दो दिल बंधे एक डोरी से या मालिकेतील विकास सेठीची एंट्री होणार आहे. कार्तिक आणि त्याच्यासारखा दिसणारा व्यक्ती याचे गूढ काय आहे हे शोधण्यासाठी विकासचा मालिकेत प्रवेश होणार आहे. विकासची या मालिकेतील भूमिका ही काहीच भागांची असली तरी ती महत्त्वाची असणार आहे. विकासने या मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात केली आहे.