Join us

शशांक रंगवणार एक रहस्यात्मक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 17:05 IST

बालिकावधू या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेला शशांक व्यास अनेक महिन्यांच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर परतणार आहे. जाना ना दिल से दूर ...

बालिकावधू या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेला शशांक व्यास अनेक महिन्यांच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर परतणार आहे. जाना ना दिल से दूर या मालिकेत त्याची लवकरच एंट्री होणार आहे. शशांकने ही मालिका जानेवारीमध्येच साईन केली होती. मालिकेत त्याच्या व्यक्तिरेखेची एंट्री मालिका सुरू झाल्यानंतर एक महिन्याने होणार असल्याचे त्याला सांगण्यात आले होते. पण काही कारणास्तव त्याची एंट्री पुढे ढकलण्यात आली. नुकतीच या मालिकेचे निर्माते आणि शशांक यांच्यात चर्चा झाली असून पुढच्या महिन्यात शशांक या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अर्थवचा सावत्रभाऊ म्हणून तो या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत शशांक साकारत असलेली भूमिका ही अतिशय रहस्यात्मक आहे. मला अनेक महिन्यांचा ब्रेक मिळाला होता. या ब्रेकमध्ये मी अनेक चांगल्या ठिकाणांना भेटी दिल्या असून आता पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे असे तो सांगतो.