द व्हॉईस इंडियाचे दुसरे सिझन लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 12:49 IST
द व्हाईस इंडिया या कार्यक्रमाचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये हिमेश रेशमिया, मिका, शान आणि ...
द व्हॉईस इंडियाचे दुसरे सिझन लवकरच
द व्हाईस इंडिया या कार्यक्रमाचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये हिमेश रेशमिया, मिका, शान आणि सुनिधी चौहान यांनी परीक्षकाची भूमिका साकारली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी स्पर्धकांना प्रशिक्षणही दिले होते. सध्या द व्हाईस इंडिया कि़ड्स हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमानंतर द व्हाईस इंडियाचा दुसरा सिझन येणार असून त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे. या कार्यक्रमासाठी ऑडिशनही घेतली गेली असल्याची चर्चा आहे.