Join us
Daily Top 2Weekly Top 5

भागे रे मनचे दुसरे पर्व लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 17:55 IST

भागे रे मन या मालिकेचे पहिले पर्व प्रचंड गाजले होते. या मालिकेतील पद्मिनी उर्फ मिनि बी हे नाव घराघरात ...

भागे रे मन या मालिकेचे पहिले पर्व प्रचंड गाजले होते. या मालिकेतील पद्मिनी उर्फ मिनि बी हे नाव घराघरात लोकप्रिय झाले होते. या मालिकेचे दुसरे पर्व लवकरच सुरू होत आहे. कोणत्याही प्रसंगात केवळ तुमच्या हृदयाचे ऐका असा संदेश या मालिकेद्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दुसऱ्या पर्वातही काहीशी अशीच कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या पर्वाच्या अखेरीस राघव आणि पद्मिनी यांच्यात प्रेम बहरत असतानाच अचानक राघवच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच रियाची एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता दुसऱ्या भागात पद्मिनी आणि राघव एकत्र येतात का याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच लागली असणार यात काही शंकाच नाही.