Join us
Daily Top 2Weekly Top 5

मि. बजाजची लवकरच होणार 'कसौटी जिंदगी के'मध्ये एन्ट्री, निर्माते बजाजच्या शोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 19:06 IST

स्टार प्लसवरील 'कसौटी जिंदगी के' मालिकेच्या कथानकाला जवळपास दर भागात मिळत असलेल्या अनपेक्षित कलाटण्यांमुळे मालिकेत सध्या नाट्यपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत.

स्टार प्लसवरील 'कसौटी जिंदगी के' मालिकेच्या कथानकाला जवळपास दर भागात मिळत असलेल्या अनपेक्षित कलाटण्यांमुळे मालिकेत सध्या नाट्यपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. आता या कथानकाला अधिकच उत्कंठावर्धक करण्यासाठी त्यात एका मि. बजाज या व्यक्तिरेखेचा समावेश करण्यात येणार असल्याचे निर्माती एकता कपूरने नुकतेच जाहीर केले आहे.

'कसौटी जिंदगी के'च्या मूळ मालिकेतही ही बजाजची व्यक्तिरेखा होती आणि ती नामवंत अभिनेता रोनित रॉयने उत्कृष्टपणे उभी केली होती. प्रेक्षकांच्या मनात आजही रोनित रॉयच्या बजाजची व्यक्तिरेखा घर करून बसली असून या मालिकेच्या कथानकाचे ती एक अविभाज्य अंग बनली होती. आताच्या मालिकेतही बजाजच्य व्यक्तिरेखेचा आत्मा कायमठेवण्यात येणार असला, तरी या व्यक्तिरेखेच्या बाह्यरूपात मोठा बदल होणार आहे. या व्यक्तिरेखेशी मिळताजुळता अभिनेत्याचा शोध सुरू झाला असून या भूमिकेसाठी कोलकात्यातील अनेक कलाकारांच्या नावांचा विचार करण्यात येत आहे.

आताच्या मालिकेत मि. बजाजची व्यक्तिरेखा कोणता अभिनेता साकारणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनेक कलाकारांची नावे त्यासाठी घेतली जात आहेत. पण ही आयकॉनिक भूमिका कोणत्या कलाकाराच्या वाट्याला येते, त्याचे उत्तर काळच देईल. बजाजच्या आगमनामुळे अनुराग आणि प्रेरणा यांच्या प्रेमकथेला खमंग फोडणीमिळेल, यात शंका नाही. 

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2