Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑफ स्क्रिन बहिणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 18:17 IST

बॉलिवुडमध्ये करिश्मा कपूर-करिना कपूर, मल्लाईका अरोरा खान-अमृता अरोरा, ट्विंकल खन्ना-रिंकी खन्ना यांसारख्या अनेक सख्ख्या बहीणी अभिनयक्षेत्रात असल्याचे आपल्याला पाहायला ...

बॉलिवुडमध्ये करिश्मा कपूर-करिना कपूर, मल्लाईका अरोरा खान-अमृता अरोरा, ट्विंकल खन्ना-रिंकी खन्ना यांसारख्या अनेक सख्ख्या बहीणी अभिनयक्षेत्रात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या बॉलिवुडप्रमाणेच छोट्या पडद्यावर आणि मराठी चित्रपटातही अनेक सख्ख्या बहिणी अभिनय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशाच काही बहिणांच्या जोड्यांवर एक नजर टाकूया...* खुशबू तावडे-तितिक्षा तावडेखुशबूने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकत आहे. खुशबूच्या पायावर पाय ठेवून तितिक्षानेही छोट्या पडद्यावर आगमन केले. ती सध्या सरस्वती या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. खुशबू हीच तिची आयडल असल्याचे तितिक्षा सांगते. समीधा गुरू - मृणाल देशपांडेसमीधा गुरू गेली अनेक वर्षं नाटकांमध्ये आणि चित्रपटात काम करत आहे. गेट वेल सून या नाटकातील, संत तुकाराम या चित्रपटातील तिची भूमिका प्रचंड गाजली होती. समीधाची बहीण मृणाल देशपांडेही छोट्या पडद्यावर काम करते. पुढचे पाऊल या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. संस्कृती खेर - सय्यामी खेरसंस्कृती खेरने हिंदी नाटकातून आपल्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर तिने स्वामी पब्लिक लिमिटेड या मराठी चित्रपटात काम केले होते. तिची बहीण सय्यामी खेर मिर्झिया या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये एंट्री करत आहेत. या दोघी ज्येष्ठ अभिनेत्री उषा किरण यांच्या नाती आहेत. अमृता राव - प्रतिका रावअमृता रावने इश्क विश्क, मस्ती, विवाह यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. सध्या ती मेरी आवाजही पहचान है या मालिकेत झळकत आहे. प्रतिका ही लेखक असून ती दक्षिणेतील काही पब्लिकेशन हाऊससाठी लिखाण करत होती. तिने बेईन्तहा या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर आगमन केले. तनुश्री दत्ता - इशिता दत्ताआशिक बनाया अापने या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये आगमन केलेली तनुश्री दत्ता गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. तिची बहीण इशिता दत्ताने एक घर बनाऊंगा या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर काम करायला सुरुवात केली. सध्या ती रिश्तो का सौदागर  - बाजीगर या प्रमुख भूमिका साकारत आहे. सानिया तौकिर - सुम्बुल तौकिरवारीस या मालिकेतील सानिया तौकिरच्या अभिनयाचे सगळेच कौतुक करत आहेत. सानियाची बहीण सुम्बुल तौकिरचीही नुकतीच या मालिकेत एंट्री झालेली आहे. या दोघींनी या आधीही जोधा अकबर या मालिकेत काम केले होते.