Join us

‘स्कॅम 1992' फेम अभिनेत्याला मिळेना काम; बेरोजगार झाल्यामुळे मागतोय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 17:27 IST

Hemant Kher: या पोस्टमध्ये त्याने निर्माते, दिग्दर्शक यांना विनंती करत त्यांच्याकडे काम मागितलं आहे.

ओटीटीवर तुफान गाजलेली वेबसीरिज म्हणजे ‘स्कॅम १९९२ – द हर्षद मेहता स्टोरी’. या सीरिजला प्रेक्षकांनी अशरक्ष: डोक्यावर उचलून घेतलं. या सीरिजमधील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्यामुळे यातील कलाकारही अल्पावधीत लोकप्रिय झाले. मात्र, याच कलाकारांपैकी एका अभिनेत्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. या अभिनेत्याला कुठेही काम मिळत नसल्यामुळे तो सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काम मागत असल्याचं समोर आलं आहे.

या सीरिजमधील हर्षद मेहताच्या भावाची भूमिका साकारणारा हेमंत खेर साऱ्यांच्याच लक्षात असेल. या सीरिजमध्ये त्याने अश्विन मेहता ही भूमिका साकारली होती. या सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेल्या हेमंतला सध्या काम मिळत नसल्यामुळे त्याच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. अलिकडेच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काम मागितलं आहे.

13 एप्रिल रोजी हेमंतने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने निर्माते, दिग्दर्शक यांना विनंती करत त्यांच्याकडे काम मागितलं होतं. त्याचीही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.  

काय आहे हेमंतची पोस्ट?

“लेखक, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर आणि निर्मात्यांना नम्र विनंती. कृपया तुमच्या कथा, चित्रपट, मालिका आणि लघुपटांमध्ये काही काम असल्यास मला संधी द्या.  एक अभिनेता म्हणून मला स्वतःला आणखी एक्सप्लोर करायचं आहे. त्यामुळे काही काम असल्यास एक अभिनेता म्हणून माझी दखल घ्या.”दरम्यान, हेमंत याने सलमान खानच्या नोटबूक या सिनेमामध्येही काम केलं होतं. त्यानंतर त्याला ‘स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी' ही सीरिज ऑफर करण्यात आली. त्यानंतर त्याने काही लहानमोठ्या सीरिजमध्येही काम केलं. 

टॅग्स :स्कॅम १९९२वेबसीरिजसेलिब्रिटीसलमान खान