Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: साडी नेसून "लाल कलरची बांगडी..." गाण्यावर थिरकली सावली, प्राप्ती रेडकरच्या अदा पाहून चाहते फिदा

By कोमल खांबे | Updated: May 15, 2026 11:14 IST

काही सेलिब्रिटींनीही "लाल कलरची बांगडी" गाण्यावर रील व्हिडीओ बनवले आहेत. 'सावळ्याची जणू सावली' फेम प्राप्ती रेडकरलाही या ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. 

संजू राठोडच्या "लाल कलरची बांगडी" या गाण्याने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. सोशल मीडियावर या गाण्यावरचे अनेक रील्स व्हायरल होत आहेत. काही सेलिब्रिटींनीही "लाल कलरची बांगडी" गाण्यावर रील व्हिडीओ बनवले आहेत. 'सावळ्याची जणू सावली' फेम प्राप्ती रेडकरलाही या ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. 

प्राप्ती रेडकरने तिच्या इन्स्टाग्रामवरुन "लाल कलरची बांगडी" गाण्यावर डान्स करनाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. स्विमिंगपूलच्या बाजूला उभं राहून प्राप्तीने हा व्हिडीओ बनवला आहे. साडी नेसून "लाल कलरची बांगडी" गाण्यावर प्राप्तीने ठेका धरला आहे. हातात लाल रंगाच्या बांगड्याही तिने घातल्याचं दिसत आहे. प्राप्तीच्या डान्सिंग अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. प्राप्ती रेडकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव चाहत्यांनी केला आहे. 


प्राप्ती 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ट्रेंडिंग गाण्यावर ती रील व्हिडीओही शेअर करत असते. प्राप्ती चाहत्यांना पर्सनल आणि करिअरमधील अपडेट्स देत असते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Prapti Redkar's saree dance on 'Lal Bangadi' song captivates fans.

Web Summary : Prapti Redkar, known for 'Savalayachi Savali,' charmed fans with a reel video dancing to 'Lal Colorchi Bangadi' in a saree by a pool. Her captivating performance quickly went viral, drawing abundant likes and comments. She is very active on social media.
टॅग्स :टिव्ही कलाकार