Join us

कोकणात बांधलं टुमदार घर! 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:45 IST

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्रीने कोकणात मस्त घर बांधलं असून अनेकांनी तिचं कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन केलंय

'सावळ्याची जणू सावली' ही मालिका सर्वांची आवडती मालिका. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. अशातच 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील एका अभिनेत्रीने मुंबईत नव्हे, पुण्यात नव्हे तर कोकणात हक्काचं घर बांधलंय. त्यामुळे सर्वांनी अभिनेत्रीचं अभिनंदन केलं आहे. ही अभिनेत्री आहे गौरी किरण. गौरीच्या कुटुंबाने कोकणातील निसर्गरम्य भागात टुमदार घर बांधलं आहे. गौरीने गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे.

गौरी किरणने कोकणात घेतलं नवीन घर

गौरी किरणने सोशल मीडियावर गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये गौरी आणि तिचं कुटुंब आनंदात दिसत आहे. गौरी आणि तिच्या कुटुंबाने या घराला 'वसंत' असं नाव दिलं आहे. गृहप्रवेशाच्या वेळी गौरीचं कुटुंब आणि कोकणातील गावकरी उपस्थित होते. गौरीने नवीन घर घेतल्यामुळे तिचे चाहते आणि मराठी सेलिब्रिटींनी तिचं अभिनंदन केलं आहे. शहरात नवं घर न घेता कोकणात नवं घर बांधल्याने अनेकांनी गौरीचं कौतुक केलंय.

गौरी किरणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलंय. गौरी किरणने सुबोध भावेसोबत 'पुष्पक विमान' या मराठी सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात गौरीने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं. गौरीने काही महिन्यांपूर्वी 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतही काम केलं. सध्या गौरी 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत झळकतेय. गौरी मराठी इंडस्ट्रीतील एक गुणी आणि हुशार अभिनेत्री आहे.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनकोकणमराठी अभिनेतामराठी चित्रपट