Join us
Daily Top 2Weekly Top 5

'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर थिरकली 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावली, व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:10 IST

Prapti Redkar : सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीलादेखील 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्याने भुरळ घातली आहे. सावली म्हणजेच प्राप्ती रेडकर हिने या गाण्यावर रिल बनवला आहे आणि तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

'गुलाबी साडी'नंतर संजू राठोडचं 'एक नंबर तुझी कंबर' (Ek Number Tuzi Kambar) हे गाणं भेटीला आलं. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या गाण्यावर सोशल मीडियावर अनेक रिल्स पाहायला मिळाले. यात सामान्यांपासून सेलिब्रेटींचाही समावेश आहे. दरम्यान आता झी मराठी वाहिनीवरील 'सावळ्याची जणू सावली' (Savlyanchi Janu Savali) मालिकेतील सावलीलादेखील या गाण्याने भुरळ घातली आहे. सावली म्हणजेच प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) हिने या गाण्यावर रिल बनवला आहे आणि तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

'सावळ्याची जणू सावली' मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेत सावलीची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने साकारली आहे. तिला या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली. नुकतेच प्राप्तीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती संजू राठोडच्या 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर थिरकताना दिसते आहे. यात ती सावलीच्या गेटअपमध्ये दिसते आहे. तिने या व्हिडीओत पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

वर्कफ्रंटप्राप्ती रेडकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने बालकलाकार म्हणून मराठी कलाविश्वात पदार्पण केलंय. तिने ‘किती सांगायचंय मला’, ‘तू माझा सांगाती’, ‘मेरे साई’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती सावळ्याची जणू सावली मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते आहे.