Join us

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत रूपालीचं सत्य अव्दैतला समजणार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 14:27 IST

नेत्रा-इंद्राणीने जंगलात सर्पलिपीच्या अर्थाविषयी लपवून ठेवलेलं रहस्य रूपालीला नागामुळे कळतं.

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. विरोचक कोण याचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे. मात्र अजून विरोचक कोण हे अव्दैतला कळलं नाहीय. नेत्रा-इंद्राणीने जंगलात सर्पलिपीच्या अर्थाविषयी लपवून ठेवलेलं रहस्य रूपालीला नागामुळे कळतं. त्यात तिला कळतं की ती विरोचक आहे. त्याचबरोबर कलियुगात तिचा सेवक अव्दैतच्या रूपात वावरत आहे.

रूपालीला विरोचकाचं सत्य कळल्यावर नेत्रा-इंद्राणी आणि शेखरला आश्चर्य वाटतं. आता काहीही करून अव्दैतला जपायला हवं त्याचबरोबर रूपालीचं खरं रूप सगळ्यांसमोर होण्यासाठी योजना आखायला हवी, असं ते तिघे ठरवतात. अव्दैत नेत्राला प्रश्न विचारतो की जर मी विरोचकाचा सेवक होतो, तर कलियुगात आता विरोचक कोण आहे. त्याचवेळी नेत्रा ठरवते की आता अव्दैतपासून सत्य लपवण्यात काहीच अर्थ नाही. योजना आखल्याप्रमाणे नेत्रा-इंद्राणी आणि शेखर, रूपालीला आपल्या जाळ्यात ओढतात. रूपालीला त्यांच्या योजनेचा पत्ता लागत नाही. त्यामुळे ती त्यांच्या जाळ्यात ओढली जाते. ज्यामुळे अव्दैतला रूपालीचं खरं रूप कळतं.

नेत्रा-इंद्राणी आणि शेखर नेमकी कोणती योजना आखतात? अव्दैतला रूपालीचं सत्य कसं समजणार? अव्दैत त्यावर विश्वास ठेवणार का तसेच विरोचक म्हणून रूपाली तिने केलेल्या गुन्ह्यांचं टोक गाठणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

टॅग्स :झी मराठी