Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता आशिष रॉय यांचे निधन, हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी देखील नव्हते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 12:51 IST

आशिष रॉय एक व्हॉईस-ओवर आर्टिस्टदेखील होते. त्यांनी ‘सुपरमॅन रिटर्न्स, ‘द डार्क नाइट’, ‘गार्जियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘द लेजेंड ऑफ टार्झन’ आणि ‘जोकर’ या हॉलिवूडपटांसाठी डबिंगही केले होते.

54 वर्षीय आशिष रॉय मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झालंय. आशिष रॉय बर्‍याच वर्षांपासून किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि यावर ते वेळोवेळ उपचारही घेत होते. आज त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अनेक सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या आशिष रॉय यांची तब्येत अनेक वर्षांपासून ठीक नव्हती. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेही नव्हते. या वर्षी मे महिन्यात, त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून चाहते आणि सहकलाकारांकडे आर्थिक मदत मागितली होती. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे ते डायलिसिसवर होते. याचसाठी त्यांना पैशांची अत्यंत गरज होती. सिनेइंडस्ट्रीतील कलाकार त्यांच्या मदतीसाठी धावून आले होते. आर्थिक मदत मिळाल्यानंतर  ते उपचार घेऊन घरीही परतले होते. 

आशिष रॉय यांना या वर्षी जानेवारी महिन्यात माइल्ड स्ट्रोक आल्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यावेळी उपचारासाठी जवळपास 9 लाख रुपये खर्च झाले होते. अशात त्यांची सर्व जमापूंजी संपली होती.आशिष रॉय मुंबईत एकटे राहत होते. तब्येत खालावली तेव्हा आशिष रॉय आर्थिक अडचणीतही सापडले  पैशांची तंगी असल्यामुळे त्यांना उपचारही घेता येत नव्हते.

 

अखेर आशिष रॉय यांच्याविषयी कळताच अनेकांनी मदतीचा हात पुढे केला होता. तसेच आशिष रॉय त्यांचा अंधेरी येथील प्लॅट विकून कोलकाताला बहिणीकडे कायमचे जाणार होते. लॉकडाउनच्या आधी त्यांनी घराची डील देखील केली होती. अॅडव्हान्स 2 लाख रुपयेदेखील घेतले होते. मात्र लॉकडाउनमध्ये घर विकत घेणाऱ्या व्यक्तीची नोकरी गेली आणि ही डील रद्द झाली. 

2019 च्या सुरुवातीच्या महिन्यात आशिष यांना अर्धांगवायू झाला होता. त्यावेळी आशिष म्हणाले होते की, "मी अर्धांगवायूच्या झटक्यानंतर बरा झालो, पण मला काम मिळाले नाही. मी सध्या माझ्या बचतीवर आयुष्य जगतोय पण तेही संपुष्टात येणार आहे.  आशिष एक व्हॉईस-ओवर आर्टिस्टदेखील होते. त्यांनी ‘सुपरमॅन रिटर्न्स, ‘द डार्क नाइट’, ‘गार्जियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘द लेजेंड ऑफ टार्झन’ आणि ‘जोकर’ या हॉलिवूडपटांसाठी डबिंगही केले होते.