सारेगमपाला मिळाले नवे होस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 14:23 IST
सारेगमप या कार्यक्रमाच्या गेल्या कित्येक सिझनचे सूत्रसंचालन आदित्य नारायण करत आहे. पण काही कामांमध्ये व्यग्र असल्याने आदित्यला तीन भागांचे ...
सारेगमपाला मिळाले नवे होस्ट
सारेगमप या कार्यक्रमाच्या गेल्या कित्येक सिझनचे सूत्रसंचालन आदित्य नारायण करत आहे. पण काही कामांमध्ये व्यग्र असल्याने आदित्यला तीन भागांचे चित्रीकरण करता येणार नाहीये. दोन भागांचे सूत्रसंचालन हे जय भानुशाली तर एका भागाचे सूत्रसंचालन अन्नू कपूर करणार आहे. जय हा त्याच्या सूत्रसंचालनाच्या खास स्टाईलसाठी ओळखला जातो तर अन्नू कपूर यांनी अनेक वर्षं अंताक्षरी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी अन्नू कपूरचा भाग ही पर्वणीच ठरणार आहे. या तीन भागांनंतर सारेगमपच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण होणार आहे. याचे सूत्रसंचालन आदित्यच करणार आहे.