Join us

'सारेगमप लिटिल' चॅम्प फेम कार्तिकी गायकवाडनं नवऱ्याला दिलं वाढदिवसाचं स्पेशल सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 14:39 IST

Kartiki Gaikwad: 'सारेगमप लिटिल' चॅम्प फेम कार्तिकी गायकवाडने तिच्या पतीला बर्थडे सरप्राईज दिले होते.

सारेगमप लिटिल चॅम्प फेम कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती स्वतःच्या गाण्याचेही बरेच व्हिडीओ तसेच पती रोनित पिसे सोबतचे रोमॅण्टिक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच कार्तिकीचा नवरा रोनित पिसेचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाला कार्तिकी गायकवाडने त्याला खास सरप्राईज दिले होते. 

कार्तिकी गायकवाडने तिच्या पतीला बर्थडे सरप्राईज दिले होते आणि हे सरप्राईज कार्तिकीने रोनितच्या ऑफिसमध्ये जाऊन दिले होते. रोनित पिसेने त्याच्या टिमसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला. रोनितने याचे काही फोटोज त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा केला. सर्व सरप्राईज आणि शुभेच्छांसाठी संपूर्ण टीमचे आभार. 

रोनितच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकीनेही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोनित. आपणांस उदंड आयुष्य आरोग्य आनंद लाभो. ही माउली चरणी प्रार्थना. ️ तुझ्या चेहऱ्यावरील चंद्रासारखी प्रसन्नता, तुझ्या कृतीत सूर्यासारखी तीव्रता आणि तुझ्या विचारातील ऋषींसारखी प्रज्ञा मला तुझ्या प्रेमात अधिकाधिक प्रेमात पाडत आहे. तू एक आश्चर्यकारक, उदार आणि दयाळू व्यक्ती आहेस. तुझ्यासोबत आयुष्याच्या या प्रवासात मी खूप उत्सुक आहे. हे पुढील वर्षदेखील अधिक चांगले आणि बऱ्याच आठवणींसोबत जावे. देव तुम्हाला सदैव आनंदी आणि समृद्ध जीवन देवो ही सदिच्छा! रोनितला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

कार्तिकी गायकवाड ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असून रोनितसोबतचे अनेक फोटो सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. याशिवाय ती तिच्या गाण्याचेही बरेच व्हिडीओज शेअर करत असते. कार्तिकीच्या गाण्याचे असंख्य चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी कार्तिकी रोनितसोबत थायलंडला टूरला फिरायला देखील गेली होती. तेथील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

टॅग्स :सा रे ग म प