सरस्वती फेम तितिक्षा तावडे झळकणार मराठी चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 13:46 IST
सरस्वती या मालिकेमुळे तितिक्षा तावडे नाव घराघरात पोहोचले. तिला या मालिकेने चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. तिला आज प्रेक्षक सरस्वती ...
सरस्वती फेम तितिक्षा तावडे झळकणार मराठी चित्रपटात
सरस्वती या मालिकेमुळे तितिक्षा तावडे नाव घराघरात पोहोचले. तिला या मालिकेने चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. तिला आज प्रेक्षक सरस्वती या नावानेच ओळखतात. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर आता ती मोठ्या पडद्याकडे वळली आहे.तितिक्षा तावडे लवकरच एका चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तितिक्षाने नुकताच हा चित्रपट साईन केला असून लवकरच ती या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कोण अभिनेता असणार तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण असणार, चित्रपट कोणत्या बॅनरचा आहे याबाबत तिने मौन राखणेच पसंत केले आहे.तितिक्षा ही खुशबू तावडेची बहीण आहे. खुशबू ही छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतदेखील ती झळकली होती. तितिक्षाने तिच्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून छोट्या पडद्यावर एंट्री मारली. तिने सरस्वती या मालिकेत काम कऱण्याआधी अनेक मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. पण तिला सरस्वती या मालिकेने खरी ओळख मिळवून दिली. खुशबू हीच तिची आयडल असल्याचे तितिक्षा नेहमीच आवर्जून सांगते. तितिक्षाला आज छोट्या पडद्यावर चांगली प्रसिद्धी मिळाली असली तरी तिला या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तितिक्षा मॅक्डोनल्डमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती.तिने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतले असल्यामुळे मॅनेजर म्हणून काही वर्षं तिने काम केले. हे काम करता करता तिने अभिनयाची आवडही जोपासली. अभिनयातच आपल्याला करियर करायचे आहे याची जाणीव झाल्यानंतर तिने मॅक्डोनल्डची नोकरी सोडली आणि तिने तिचे संपूर्ण लक्ष या क्षेत्राकडे दिले. सरस्वती या मालिकेतील तितिक्षा साकारत असलेली सरस्वतीची भूमिका तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत या मालिकेतील राघव आणि सरस्वतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यामुळे आता तितिक्षा चित्रपटात झळकणार हे तिच्या फॅन्सना कळल्यावर तिची जोडी कोणासोबत जमणार याची उत्सुकता त्यांना नक्कीच लागणार आहे. Also Read : सेटवरच तितिक्षाने रंगवली मेकअप रूम