Join us

11 वर्षांनंतर साराभाई व्हर्सेस साराभाई पुन्हा परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 14:24 IST

  वर्षांच्या लीप दाखवून मालिका सुरु करण्यात येणार आहे. साराभाई व्हर्सेस साराभाईच्या टीममध्ये कोणतेच बदल केले जाणार नाही आहेत. ...

  वर्षांच्या लीप दाखवून मालिका सुरु करण्यात येणार आहे. साराभाई व्हर्सेस साराभाईच्या टीममध्ये कोणतेच बदल केले जाणार नाही आहेत. जुन्या चेहऱ्यांसह नवीन चेहरेही मालिकेत झळकणार आहे. नुकतेच मालिकेचे दिग्दर्शकाने ही मालिका पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती  दिली होती. मात्र नेमकी ती कधी सुरु होणार याबाबत काहीच जेडीने सांगितले नव्हते. साराभाई व्हर्सेस साराभाई पुन्हा सुरु करा अशी मागणी प्रेक्षकांना होत असल्याचे दिग्दर्शकाने सांगितले आहे. साराभाई व्हर्सेस साराभाईमध्ये याआधी रत्ना पाठक, सतीश शहा, रुपाली गांगुली, राजेश कुमार आणि सुमित राघवन यांच्या मुख्य भूमिका होत्या. यासगळ्यांनी मिळून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. निर्माता जमनादास मजिठियाने या मालिकेचे शूटिंग एप्रिलपर्यंत चालणार असल्याचे सांगितले आहे. त्यांना मे महिन्यांपर्यंत साराभाई व्हर्सेस साराभाई मालिका प्रेक्षकांच्या भेटिला आणायची आहे. या मालिकेची सुरुवात 1 नव्हेंबर 2004मध्ये झाली होती. 2006 पर्यंत या मालिकेने रसिकांचे भरपूर मनोरंजन केले. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती ही मालिका आवडीने बघायचे. या टीमला एकत्र बांधून ठेवण्याचे क्रे़डिड मोनिषा म्हणजेच रुपाली गांगुलीला जाते. गेल्या 11 वर्षांपासून तिने प्रत्येकाला संपर्कात ठेवले. आता ती आपल्या संपूर्ण टीमसह पुन्हा एकदा रसिकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना यानिमित्त मनोरंजनाची ट्रीट मिळणार एवढे मात्र नक्की.