Join us

साराभाई परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 15:53 IST

साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेला आज इतकी वर्षँ झाली असली तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ...

साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेला आज इतकी वर्षँ झाली असली तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेचा दुसरा सिझन पुन्हा कधी सुरू होणार हा प्रश्न नेहमीच या मालिकेचा निर्माता जे.डी.मजेठीयाला विचारण्यात येतो. या मालिकेतील सगळ्या कलाकारांच्या वेळा जुळल्या तरच या मालिकेचा सिझन येऊ शकेल असे जे.डी.चे त्यावर म्हणणे असते. या मालिकेचा सिझन लवकरच येणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण जे.डीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर साराभाई या मालिकेतील सगळ्या कलाकारांचा एकत्र फोटो पोस्ट केला आहे आणि या पोस्टच्या खाली आम्ही सगळे सतीश शहा यांच्या घरी एकत्र जमलेलो आहोत. लवकरच प्रेक्षकांना खूप चांगली बातमी मिळणार आहे असे म्हटले आहे. जे.डीने या ट्वीटमधून साराभाई ही मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येणार असल्याचे संकेत दिले आहेत.