Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर ‘डब्या’ झाला सैराट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 19:34 IST

प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या भन्नाट गाण्यांनी सजलेला आणि नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा येत्या २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या भन्नाट गाण्यांनी सजलेला आणि नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा येत्या २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सैराटची टीम थुकरवाडीमध्ये पोहचली आणि मंचावर एकच धमाल उडवून दिली. आपल्या ‘झिंगाट’ गाण्यांनी सर्वच प्रेक्षकांना ‘याड’ लावणाºया सैराट चित्रपटाची सध्या सर्वत्र हवा आहे.