Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘काला टीका’मध्ये रंगणार सप्तरंगी लग्न सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 19:22 IST

‘काला टीका’ या झी टीव्हीवरील मालिकेत अंधश्रद्धेवर प्रहार करण्यात आला आहे. काली उर्फ सिमरन परींजा या मालिकेची मुख्य नायिका ...

‘काला टीका’ या झी टीव्हीवरील मालिकेत अंधश्रद्धेवर प्रहार करण्यात आला आहे. काली उर्फ सिमरन परींजा या मालिकेची मुख्य नायिका आहे. कालीचे मालिकेत लग्न असून यात ती लग्नात केवळ काळे कपडे परिधान करण्याच्या समजूतीला धुडकावून लावणार आहे. या मालिकेत काली केवळ काळ्या कपड्यांमध्येच दिसली. आता मात्र ती रंगीबेरंगी पोशाखात दिसणार आहे. लग्नामधील सात वेगवेगळ्या विधींमध्ये ती रंगीबेरंगी पोशाख परिधान करणार आहे. काळ्या रंगात बारीक दिसते. पण या वेगवेगळ्या रंगातही सडपातळ दिसावे, यासाठी सिमरनने जिम ही जॉईन केले आहे. स्वत: सिमरन मालिकेतील स्वत:च्या लग्नासाठी प्रचंड उत्साहात आहे. मालिकेत माझी व्यक्तिरेखा कायम काळ्या कपड्यांमध्ये दिसली. प्रथमच मी रंगीत कपड्यांमध्ये दिसणार आहे. लग्नाच्या या सिक्वेंसमध्ये मी सुंदर दिसावे, यासाठी मी प्रचंड मेहनत घेतेय, असे सिमरन म्हणाली. आता सिमरन इतकी उत्साही आहे म्हटल्यावर कालीचे लग्न बघायलाच हवे...