सपना चौधरीच्या शोमध्ये एका उत्साही चाहत्याने केला भन्नाट डान्स; सपनाने स्टेजवरूनच जोडले हात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 16:57 IST
हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिच्या नुकत्याच झालेल्या एका शोमध्ये एक उत्साही चाहता ठुमके लावताना बघावयास मिळाला. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सपना चौधरीच्या शोमध्ये एका उत्साही चाहत्याने केला भन्नाट डान्स; सपनाने स्टेजवरूनच जोडले हात!
हरियाणवी डान्सर सपना चौधरी जेव्हा परफॉर्मन्स करते तेव्हा तिचे चाहते मनसोक्त होऊन तिच्याबरोबर डान्स करीत असतात. बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये बघावयास मिळालेली सपना केवळ हरियाणातच नव्हे तर संपूर्ण देशात लोकप्रिय झाली आहे. शिवाय तिच्या चाहत्यांमध्ये जबरदस्त भर पडत आहे. याचा प्रत्यय तेव्हा आला जेव्हा ती हरियाणाच्या झज्जरमध्ये शो करण्यासाठी पोहोचली होती. याठिकाणी चाहत्यांनी सपनाच्या डान्सचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. काही चाहत्यांनी तर तिच्यासोबत ठुमकेही लावले. परंतु त्यातील एक चाहता जरा जास्तच चर्चेत राहिला. या चाहत्याने सपनासोबत प्रेक्षकांमधून असे काही ठुमके लावले की, अखेर सपनाने त्याला मंचावरूनच हात जोडले. नेहमीच देसी अंदाजात डान्स करणाºया सपनाने यावेळी वेस्टर्न डान्सिंग मुव्जच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केले. चाहत्यांना तिचा हा अंदाज चांगलाच भावला. सपनाचा हा शो काही दिवसांपूर्वीच आयोजित केला होता. शोच्या सुरुवातीला सपनाचा एक चाहता प्रेक्षकांमधूनच तुफान डान्स करू लागला. सपनानेही त्याच्याकडे इशारा करीत डान्सच्या काही स्टेप्स केल्या. परंतु सपनाचा डान्स बघून या चाहत्याला चांगलाच हुरूप आला. त्याने असे काही ठुमके लावले की, उपस्थित प्रेक्षकांच्या नजरा सपनाऐवजी त्याच्याकडे वळल्या. अखेर सपनाने स्टेजवरून त्या उत्साही चाहत्याच्या दिशेने हात जोडत आपला डान्स सुरू ठेवला. बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये सपना चौधरी बघावयास मिळाली होती. या शोमुळे सपनाला प्रचंड लोकप्रियता मिळाली असून, सध्या ती चित्रपटात येण्याची तयारी करीत आहे. नुकताच ‘वीरे की वेडिंग’ या चित्रपटात सपनाचा पहिला डान्सिंग नंबर रिलीज करण्यात आला होता. याव्यतिरिक्त सपना अभिनेता अभय देओल याच्यासोबत एका चित्रपटात बघावयास मिळणार आहे. ‘बैरी पिया-२’मध्ये आयटम डान्स करणार आहे. तिने या गाण्याची शूटिंगही पूर्ण केली असून, याच वर्षी तिचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.