Join us

सपना चौधरीने केली शूटिंगला सुरुवात; चित्रपटात सपना बनणार अभय देओलची जानू, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST

बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये बघावयास मिळालेली हरियाणवी डान्सर सपना चौधरी आता छोट्या पडद्यानंतर मोठ्या पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडताच सपनाने तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सपना ‘नानू की जानू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अभय देओल तिच्या अपोझिट असेल. सध्या अभय आणि सपना शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये बघावयास मिळालेली हरियाणवी डान्सर सपना चौधरी आता छोट्या पडद्यानंतर मोठ्या पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडताच सपनाने तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सपना ‘नानू की जानू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अभय देओल तिच्या अपोझिट असेल. सध्या अभय आणि सपना शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.शेअर केलेल्या फोटोंवरून असे दिसत आहे की, एखाद्या डान्स सीक्वेंसची शूटिंग केली जात असावी.या फोटोंमध्ये सपना हिरव्या आणि नारंगी रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसत आहे, तर अभय ब्ल्यू डेनिम पॅण्ट आणि जॅकेटमध्ये दिसत आहे.या चित्रपटात अभय आणि सपना व्यतिरिक्त अभिनेत्री पत्रलेखाही बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराज हैदर करीत आहेत.हा चित्रपट एक सुपरनॅचरल लव्ह स्टोरीवर आधारित आहे.चित्रपट पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे. सपना जेव्हा बिग बॉस हाउसमध्ये होती, त्याचवेळी तिच्या या चित्रपटाचे एक व्हिडीओ साँग रिलीज करण्यात आले होते. या व्हिडीओ साँगने सोशल मीडियावर धूम उडवून दिली होती.