Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या २ महिन्यातच संजीवनी-२ गाशा गुंडाळणार?, निर्मात्याने सांगितली खरी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 10:41 IST

संजीवनीच्या या नव्या सिझनमध्ये देखील डॉक्टरांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत असून मोहनीश बहल, गुरदीप कोहली, सुरभी चंदना, सयंतनी घोष आणि नमित खन्ना हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

संजीवनी या गाजलेल्या मालिकेचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी टीआरपी रेटिंगमध्ये या मालिकेने अजूनतरी टॉप टेनच्या यादीत आपले स्थान निर्माण केलेले नाही. त्यामुळेच काही दिवसांपासून ही मालिका बंद होत असल्याचे चर्चा ऐकायला मिळत आहे. मालिकेतील कलाकारांनीही ही मालिका बंद होणार असल्याची भीती वाटत आहे.  मात्र यावर कोणाकडूनही स्पष्टीकरण येत नव्हते. अखेर मालिकेचे निर्माते सिद्धार्थ मल्होत्रा यांनी मौन सोडले आहे. त्यांनी ही मालिका बंद होणार नसल्याचे सांगितले आहे. या केवळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

 

संजीवनी ही मालिका 2002 साली प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेत गुरूदीप कोहली, मिहीर मिश्रा, संजीत बेदी, मोहनिश बहल, इरावती हर्षे, शिल्पा शिंदे, अर्जुन पुंज यांच्या मुख्य भूमिका होत्या. ही मालिका एका रुग्णालयातील डॉक्टरांच्या आयुष्यावर बेतलेली होती. या डॉक्टरांचे आपापसातले मतभेद, त्यांच्या प्रेमकथा या मालिकेत पाहायला मिळाल्या होत्या. ही मालिका चांगलीच गाजली होती. संजीवनीच्या या नव्या सिझनमध्ये देखील डॉक्टरांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत असून मोहनीश बहल, गुरदीप कोहली, सुरभी चंदना, सयंतनी घोष आणि नमित खन्ना हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत मोहनिश आणि गुरदीप कोहली हे संजीवनी मालिकेतील दोन जुने चेहरे आणि काही नवीन चेहरे पाहायला मिळाले. यात मालिकेच्या टीममध्ये आणखी एका कलाकाराची भर पडली. मोहनिश बहलच्या पत्नीची या मालिकेत लवकरच एंट्री झाली होती. अभिनेत्री आरती बहल आता या मालिकेत डॉ. सिद्धांत माथुर म्हणजेच नमित खन्नाच्या आईची भूमिका साकारत आहेत.

 

टॅग्स :मोहनिश बहल