Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय कपूरला दिलेले वचन विक्रम भटने पाळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 13:53 IST

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर खूप सा-या घडामोडी पाहायला मिळत आहेत. रटाळ मालिका बंद होत नवीन मालिका रसिकांच्या भेटीला ...

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर खूप सा-या घडामोडी पाहायला मिळत आहेत. रटाळ मालिका बंद होत नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येत आहेत. रसिकांचे मनोरंजन होईल अशा कथा छोट्या पडद्यावर पाहायला मिळतील.अशीच एक हिंदी मालिका तुमच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकेत दिग्गज कलाकरांची फौज रसिकांना पाहायला मिळतील.मुळात असे खूप कमी वेळा होते की, दिलेले वचन पाळले जाते.कलाकरांना दिलेले वचन देणे ही बॉलिवूडची प्रथा असली तरी या सिनेसृष्टीत काही अशीही माणसे आहेत जे आपण एकदा दिलेले वचन पाळतात. अशीच एक गोष्ट विक्रम भट आणि अभिनेता संजय कपूर यांची आहे. ‘स्टार प्लस’वर लवकरच प्रसारित होणा-या ‘इश्क गुनाह’ या मालिकेत विक्रम भटने संजय कपूरला नायकाची भूमिका देऊन आपले हे वचन पाळले.पूर्वी संजय कपूर आणि शाहरूख खान तसेच करिष्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘शक्ती’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर संजय कपूरबरोबर नवा चित्रपट करण्याची इच्छा विक्रम भटने व्यक्त केली होती. दुर्दैवाने या दोघांना पसंत पडेल अशी पटकथा इतक्या वर्षांत त्यांना मिळाली नाही. या घटनेला 15 वर्षे उलटून गेली असून अजूनही हे दोघे परस्परांना पसंत पडेल, अशा परिपूर्ण पटकथेच्या शोधात आहेत. परंतु ‘इश्क गुनाह’ या टीव्ही मालिकेच्या रूपाने अखेरीस दोघांना पसंत पडेल अशी पटकथा त्यांना सापडली आणि त्यामुळे या मालिकेत संजय कपूर हा प्रमुख भूमिकेत आहे.त्याच्या नायिकेची भूमिका स्मृती कालरा साकारणार आहे.संजय कपूरने सांगितले, “आम्हा दोघांनाही पसंत पडेल, अशी पटकथा अखेरीस आम्हाला सापडली ही चांगली गोष्ट आहे. गेले काही महिने आम्ही दोघांनीही माझ्या भूमिकेवर बरीच चर्चा केली आहे आणि आम्ही आता प्रत्यक्ष कामाला प्रारंभही केला आहे.”