Join us

छोट्या पडद्यावर दिसणार संजय दत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 12:47 IST

रणबीर कपूर-अभिनित संजू हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक गल्लाभरू यशस्वी चित्रपट ठरला आहे. 

ठळक मुद्देसंजय दत्त छोट्या पडद्यावर सांगणार जीवनातील काही अनुभव

रणबीर कपूर-अभिनित संजू हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक गल्लाभरू यशस्वी चित्रपट ठरला आहे. राजकुमार हिराणी निर्मित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडीत काढीत नवे उच्चांक निर्माण केले आहेत. मोठ्या पडद्यावर रसिकांचे उदंड प्रेम लाभल्यानंतर आता लवकरच हा चित्रपट स्वाभाविकपणे स्टार प्लस वाहिनीवरून प्रसारित केला जाणार आहे. इतकेच नव्हे, तर या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी तयार केलेल्या विशेष प्रोमोंमध्ये स्वत: संजय दत्त सहभागी झाला आहे.

एका सूत्राने सांगितले, “या प्रोमोचे चित्रीकरण मुंबईतच होणार असून त्यात संजय दत्त आपल्या जीवनातील काही अनुभव सांगणार आहे. ज्याच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे, त्याच्या तोंडूनच त्याची कथा ऐकण्यापेक्षा दुसरे काय चांगले असू शकते!”संजू या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. रणबीरच्या यातील अभिनयाचे सध्या जोरदार कौतुक होत आहे.  ‘संजू’हा रणबीरच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले होते. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील वेगवेगळ्या शेड्स दाखवण्यात आल्या होत्या. आता हा बायोपिक स्टार प्लस वाहिनीवर 14 ऑक्टोबरला पाहता येणार आहे. 

टॅग्स :संजय दत्तसंजू चित्रपट 2018रणबीर कपूर