Join us
Daily Top 2Weekly Top 5

संगीता घोष ह्या कारणामुळे सोशल मीडियापासून राहते लांब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 07:15 IST

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संगीता घोष आता स्टार प्लस वाहिनीवरील दिव्य दृष्टी मालिकेत दिसणार आहे. 

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संगीता घोषने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.  ‘देस में निकला होगा चांद’ आणि ‘रिश्तों का चक्रव्यूह’ अशा मालिकांसाठी आजही तिची आठवण काढली जाते. आता ती स्टार प्लस वाहिनीवर लवकरच दाखल होत असलेल्या दिव्य दृष्टी मालिकेत दिसणार आहे. 

सोशल मीडियावर जास्त सक्रीय असल्याचे दिसत नाही. याबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली की, “मी एक अभिनेत्री असल्यामुळे कायमच कामात व्यग्र असते आणि त्यामुळे मला स्वतःसाठी व माझ्या जवळच्या लोकांसाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे मी सोशल मीडियापासून लांब राहते आणि त्यामुळे मला थोडा वेळ मिळतो. माझ्या चाहत्यांसोबत संवाद साधण्याचे माझे असे मार्ग आहेत आणि त्यांच्या प्रेमापासून मी कधीच चुकत नाही. नवनवीन ट्रेंड्‌स जाणून घेण्यासाठी मी कधीकधी टि्‌वटरचा वापर करते.”संगीता स्टार प्लसवरील आगामी मालिका ‘दिव्य दृष्टी’मध्ये पिशाचिणीच्या रूपात दिसून येणार असून ही कथा आहे सुपर पॉवर्स असलेल्या दोन बहिणींची. दृष्टीला भविष्य दिसते तर दिव्यकडे ते बदलण्याची असाधारण क्षमता आहे. अशा सुपर पॉवर्सना धोका हा असतोच, त्यामुळे ह्या बहिणींना दुष्ट पिशाचिणीपासून सावध राहायला हवे.‘दिव्य दृष्टी’ २३ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ७ वाजता दर शनिवार-रविवारी फक्त स्टार प्लसवर प्रसारीत होणार आहे. 

टॅग्स :स्टार प्लस